Three newly inducted into Shiv Chhatrapati Awards distribution ceremony will held in Pune today esakal
क्रीडा

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये तिघांचा नव्याने समावेश; पुण्यात आज वितरण सोहळा रंगणार

कल्याणी जोशी यांनी पुरस्कार जाहीर केलेल्यांपैकी मिताली वाणी यांच्याबाबत आक्षेप घेतला होता.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार यादीमध्ये मल्लखांबपटू ऋषिकेश अरणकल्ले, आट्यापाट्या खेळाडू महेश ठाकरे आणि पॉवरलिफ्टिंग खेळाडू अभिजित गुरव या तीन खेळाडूंचा नव्याने समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे वितरण आज (ता. २८) पुणे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल (बॅडमिंटन हॉल) येथे होणार आहे. महाराष्ट्र राज्याचे क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

महाराष्ट्र शासनाच्या वतीने २०१९-२०, २०२०-२१ व २०२१-२२ या वर्षासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, खेळाडू पुरस्कार, एकलव्य खेळाडू पुरस्कार (दिव्यांग खेळाडू), साहसी क्रीडा पुरस्कार व जिजामाता पुरस्कारांचे वितरण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत होणार आहे.

पुरस्काराबाबत न्यायालयात अर्ज सादर करण्याऱ्या खेळाडूंपैकी ऋषिकेश अरणकल्ले, महेश ठाकरे, अभिजित गुरव यांचे अर्ज पुरस्कार निवड समितीने मान्य केले असून त्यांना पुरस्कार दिला जाणार आहे; मात्र गणेश नवले, विराज परदेशी, विराज लांडगे, कल्याणी जोशी यांच्या अर्जांची पुन्हा छाननी करण्यात आली आणि निवड समितीने त्यांचे अर्ज अमान्य केले आहेत.

कल्याणी जोशी यांनी पुरस्कार जाहीर केलेल्यांपैकी मिताली वाणी यांच्याबाबत आक्षेप घेतला होता. त्यांच्या या आक्षेपाबाबत संबंधित खेळाच्या राज्य व राष्ट्रीय संघटनांकडून माहिती घेण्यासाठी वाणी यांना पुरस्कार देण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे.

बुंडेस लीगाबरोबर महाराष्ट्र राज्य शासनातर्फे फुटबॉलच्या विकासासाठी करार केला जाणार आहे. जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णमय कामगिरी करणाऱ्या अदिती स्वामी हिचा लवकरच शासनातर्फे सत्कार केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT