Tilak Varma ODI debut sakal
क्रीडा

Tilak Varma ODI debut : तिलक वर्माचे वनडेत पदार्पण, कर्णधार रोहितने बदलला अर्धा संघ

Kiran Mahanavar

Tilak Varma to make his ODI debut : आशिया कप 2023 मध्ये आज सुपर 4 फेरीचा शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यात खेळला जात आहे. भारतीय क्रिकेट संघाने या मेगा स्पर्धेच्या अंतिम फेरीत आपले स्थान आधीच पक्के केले आहे, तर बांगलादेशी संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. या सामन्यात डावखुरा फलंदाज तिलक वर्माला पदार्पणाची संधी मिळाली आहे.

तिलक वर्माने टी-20 नंतर 43 दिवसांनी वनडे किक्रेटमध्ये पदार्पण करत आहे. नुकतेच त्याने 3 ऑगस्ट रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-20 मालिकेत, डावखुरा फलंदाज तिलकने पाच सामन्यांमध्ये 57.67 च्या सरासरीने आणि 140.65 च्या स्ट्राइक रेटने 173 धावा केल्या.

तिलक वर्मा हा भारतीय वर्ल्ड कप संघाचा भाग नाही, पण आजपर्यंत त्याला टी-20 मध्ये ज्या काही संधी मिळाल्या त्यामध्ये त्याने आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. अशा स्थितीत भारतीय संघ व्यवस्थापनाला वाटत आहे की, जर कोणताही खेळाडू जखमी झाला तर कदाचित त्याचे संघात स्थान निर्माण होऊ शकेल.

नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रोहितने पाच बदल केले आहेत. विराट कोहली, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांना अंतिम सामन्यापूर्वी विश्रांती देण्यात आली आहे. तिलक व्यतिरिक्त सूर्यकुमार यादव, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर यांना प्लेइंग-11 मध्ये संधी मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump Blockade: 'जवळ आलात तर नष्ट करून टाकू'! डोनाल्ड ट्रम्प यांची आक्रमक धमकी; इराणच्या बंदरांवर नाकाबंदी

SRH vs RR : ७ धावांत ४ विकेट्स! Praful Hinge ने इतिहास रचला; वैभव सूर्यवंशीची विकेट मिळताच काव्या मारनचा आनंद पाहा... Video

Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..

RR vs SRH: वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल अन्... विदर्भच्या पोरांनं मैदान गाजवलं; जे भल्याभल्यांना जमलं नाही ते करून दाखवलं

Baramati Bypoll News: बारामती पोटनिवडणूक : सुनेत्रा पवारांच्या विजयासाठी भाजपचा बूथस्तरावर निर्धार, विकासकामांवर भर

SCROLL FOR NEXT