pat cummins  Sakal
क्रीडा

IPL2021: पॅट कमिन्सची माघार; KKRला मिळाला नवा अनुभवी गोलंदाज

विराज भागवत

कमिन्स नुकताच बाबा झाल्याने उर्वरित हंगामातून घेतली माघार

IPL 2021 in UAE: कोलकाता नाईट रायडर्स संघाचा अष्टपैलू खेळाडू पॅट कमिन्स याने वैयक्तिक कारणाने स्पर्धेच्या उर्वरित हंगामातून माघार घेतली. त्याच्या जागी कोलकाता संघाला एक अनुभवी वेगवान गोलंदाजाचा पर्याय मिळाला आहे. KKRने न्यूझीलंडचा टीम साऊदी याला संघात स्थान दिले आहे. कमिन्स हा IPL लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण त्याने उर्वरित हंगामातून माघार घेतली आहे. कमिन्सच्या जागी साऊदीला संघात स्थान देण्यात आल्याचे वृत्त एका क्रीडा वाहिनीने दिले आहे.

टीम साऊदी हा अतिशय प्रतिभावान खेळाडू आहे. गेली अनेक वर्षे तो न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीचा कणा म्हणून ओळखला जातो. युएईच्या खेळपट्ट्यांवर टीम साऊदीचा आमच्या संघाला नक्कीच खूप फायदा होईल, अशी माहिती KKRने एका प्रसिद्धीपत्रकात दिली. साऊदी IPL 2020च्या लिलावात विकला गेला नव्हता. २०१४ ते २०१९ या कालावधीत तो IPLमध्ये खेळला होता. त्याने IPL मध्ये ४० सामन्यात २८ बळी घेतले आहेत. २०१९च्या IPLमध्ये विराटच्या संघाकडून खेळताना त्याने केवळ एकच बळी टिपला होता. त्यामुळे गेल्या हंगामात त्याला कोणीही विकत घेतले नव्हते.

पॅट कमिन्स हा खूपच अनुभवी खेळाडू आहे. पण त्याच्या पत्नीने नुकताच बाळाला जन्म दिला. त्यामुळे आपल्या पत्नीची आणि बाळाची काळजी घेण्याच्या उद्देशाने त्याने हंगामाच्या उर्वरित सामन्यांतून माघार घेतली आहे. IPL 2021मध्ये पॅट कमिन्सने सात सामने खेळले आणि ११ बळी टिपले. फलंदाजीतही त्याने दमदार कामगिरी करून दाखवली. चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध त्याने नाबाद ६६ धावांची तुफानी खेळीदेखील केली. पण असे असले तरी सध्या कोलकाताचा संघ गुणतक्त्यात सातव्या स्थानी आहे. २० सप्टेंबरला अबुधाबीच्या मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्ध त्यांचा दुसऱ्या टप्प्यातील सलामीचा सामना होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT