Tim Southee 
क्रीडा

World Cup 2023 : वर्ल्डकपआधी संघाला मोठा धक्का! स्टार वेगवान गोलंदाजाच्या अंगठ्यावर होणार शस्त्रक्रिया

Kiran Mahanavar

Tim Southee : येत्या ५ ऑक्टोबरपासून आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपचा थरार 5 ऑक्टोबरपासून भारतात रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या जाणार आहे. पण वर्ल्डकपआधी न्यूझीलंड संघ दुखापतींच्या समस्येशी झुंजत आहे.

नियमित कर्णधार केन विल्यमसनला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागू शकते. दरम्यान, वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या रूपाने संघाला आणखी एक धक्का बसला आहे, कारण वर्ल्डकपपूर्वी त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्याच्या वर्ल्डकप खेळण्याबाबतचा निर्णय येत्या काही वेळात घेतला जाईल.

न्यूझीलंडच्या इंग्लंड दौऱ्यात वेगवान गोलंदाजाला दुखापत झाली. आता टीम साऊथी वर्ल्डकप 2023 खेळणार का नाही, यावर पुढील आठवड्यात निर्णय घेतला जाईल. त्याच्या अंगठ्याचे हाड फ्रॅक्चर असल्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. शनिवारी लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम वनडेत साउथीला दुखापत झाल्यानंतर न्यूझीलंड क्रिकेटने बुधवारी दुपारी या वृत्ताला दुजोरा दिला.

डॉक्टरांच्या अहवालानंतर, 34 वर्षीय खेळाडूची निवड केली जाईल. संघ अनेक दुखापतींशी झुंजत आहे, त्यामुळे प्रशिक्षक गॅरी स्टेडला आशा आहे की साऊथी वेळेत बरा होईल. स्टीड म्हणाले, आम्हाला खात्री आहे की टिमची शस्त्रक्रिया चांगली होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT