Mirabai Chanu Twitter
क्रीडा

ऑलिम्पिकच्या गर्दीत लक्षवेधी ठरलेल्या चानूला मिळणार खाकी वर्दी!

मीराबाई चानूसाठी राज्य सरकारची आणखी एक मोठी घोषणा

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेत भारताला पदकाचे खाते उघडून देणारी महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू पोलिस अधिकारी होणार आहे. मणिपूर सरकारने स्पोर्ट्स कोटयातून चानूला पोलिस विभागात अतिरिक्त पोलीस अधिक्षकचा पदावर रुजू करुन घेणार असल्याची घोषणा केलीये. जपानमधील टोकियोत चंदेरी कामगिरीनंतर मायदेशी भूमिवर पाउल ठेवताच मणिपूर सरकारने मिराबाई चानूला सरकारी नोकरीची ऑफर केलीये. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. (tokyo olympic 2020 silver medallist saikhom mirabai chanu appoint additional superintendent of police manipur government)

ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर मीराबाई चानू सोमवारी मायदेशी परतलीये. राजधानी दिल्लीत तिचे जंगी स्वागतही करण्यात आले. मायदेशी परतल्यानंतर चानूने प्रसारमाध्यमांशी संवादही साधला. रिओ ऑलिम्पिकमधील पराभवातून खूप काही शिकायला मिळाले. मागील ऑलिम्पिकमधील पराभवानंतर स्वप्न साकार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली. टोकियोत प्रशिक्षकांचे आणि माझे हे स्वप्न साकार झाले. स्वप्न साकार करण्यासाठी मागील पाच वर्षांत खूप गोष्टींचा त्याग करावा लागला, असेही चानून प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. अभिनंदनाचा वर्षाव करणाऱ्या भारतीय नागरिकांचे आभार मानायलाही ती विसरली नाही.

मीराबाई चानूने 21 वर्षानंतर वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला पदक मिळवून दिले. 49 किलो वजनी गटात एकूण 202 किलो (87 किलो + 115 किलो) वजन उचलत तिने रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी कर्णम मल्लेश्वरीने 2000 साली सिडनी ओलिम्पिकमध्ये वेटलिफ्टिंग प्रकारात भारताला कांस्य पदक मिळवून दिले होते.

जगातील मानाच्या स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर मीराबाई चानूने मायदेशी परतल्यावर पहिल्यांदा गावी जाणार असल्याची भावना व्यक्त केली होती. ऑलिम्पिकच्या सरावामुळे दोन वर्षे ती गावी गेलेलीच नाही. देशासह आपल्या गावाचा ती अभिमान बाळगते. ती जेव्हा जेव्हा परदेशात स्पर्धेसाठी जाते तेव्हा तेव्हा ती आपल्यासोबत मायदेशातील माती सोबत घेऊन जाते. एवढेच नाही तर घरचे तांदुळ घेऊन जायलाही ती विसरत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime News : "इथून पुढे कोणत्याही हिंदू मुलीच्या नादाला लागणार नाही..." शाहिद सनदीने हात जोडून मागितली माफी, व्हिडिओ समोर

IPL 2026: विराट कोहलीला एकच व्यक्ती चॅलेंज देऊ शकतो, तो म्हणजे...; इरफान पठाणची पोस्ट चर्चेत, तुम्हालाही पटेल त्याची गोष्ट

नेहमी दुसऱ्यांकडून सल्ला घेतात 'या' 2 मुलांकाचे लोक; एक चुकीचा निर्णय करतो आयुष्य उध्वस्त, करियर अन् पर्सनल लाइफचे होते नुकसान

Jet Fuel Price Hike : जेट इंधन दरवाढीने विमान कंपन्या संकटात; उड्डाण सेवा ठप्प होण्याचा धोका

भारतीय गोलंदाजांना झोडावंस वाटतं! मिसुरडंही न फुटलेल्या पाकिस्तानी फलंदाजाची धमकी; म्हणतो, ते समोर आले की...

SCROLL FOR NEXT