क्रीडा

Olympics : टॉपर सिंधूनं गाठली प्री क्वार्टर फायनल

नामदेव कुंभार

Tokyo Olympics 2020 PV Sindhu : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीमध्ये सलग दुसरा विजय संपादन केला आहे. टोकियो ऑलिम्पिकमधील सिंधूचं दमदार प्रदर्शन पाहायला मिळत असून भारताची पदकाची आशा पल्लवीत झाली आहे. दुसऱ्या फेरीत सिंधूने हाँगकाँगच्या चेयुंगचा सहज पराभव करत प्री-क्वॉर्टर फायनल्समध्ये धडक मारली आहे.

सिंधूने 34 व्या स्थानावर असलेल्या हाँगकाँगच्या चेयुंगचा सरळ दोन सेटमध्ये 21-9, 21-16 अशा फरकाने पराभव केला आहे. सिंधूने क्रॉसकोर्ट स्मॅशचा पूरेपूर वापर करत प्रतिस्पर्धी खेळाडूवरील दबावात टाकले. तिने पहिला सेट सहज आपल्या नावे केला. या विजयासह सिंधूने सुवर्णपदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलं आहे.

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेतील चॅम्पियन आणि रिओ ऑलिम्पिकची रौप्य पदक विजेत्या पीव्ही सिंधूकडून टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदकाची आपेक्षा आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागाल आहे. त्यामुळे आता भारताच्या सर्व आशा सिंधू आणि मेरी कोम या अनुभवी खेळाडूंवर आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीचा विचार करताय? दरात रातोरात मोठा बदल; मुंबई-पुण्यात 10 ग्रॅमचा भाव कुठे पोहोचला?

MahaDBT Scheme: २९ नव्या योजना महाडीबीटीवर, घरबसल्या १०५ शासकीय योजनांचे लाभ मिळणार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

SCROLL FOR NEXT