Lovlina Borgohain Twitter
क्रीडा

Olympics : पदार्पणात लवलिनाला कांस्य; भारताच्या खात्यात तिसरे पदक

स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूने वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये सिंधूला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2021 : टॉकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील लवलिना बोर्गोंहिमचा प्रवास सेमीफायनलमध्येच संपुष्टात आलाय. 69 किलो वजनी गटात पदार्पणातच तिने लक्षवेधी कामगिरी नोंदवलीये. तुर्कस्तानची विद्यमान विश्वविजेती बुसेनाझ सुरमेनेली हिच्या विरुद्धच्या लढतीतील पराभवामुळे लोवलिनाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. तिच्या या पदकासह भारताच्या खात्यात 3 पदके जमा झाली आहेत.

स्पर्धेतील दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूने वेट लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली होती. त्यानंतर बॅडमिंटनमध्ये सिंधूला कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. आसामची 23 वर्षीय बॉक्सर ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी तिसरी भारतीय ठरलीये. यापूर्वी विजेंदर सिंग (2008) आणि मेरी कोम (2012)मध्ये पदकाची कमाई केली होती. या दोघांनाही कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले होते. महिला वेल्टर वेट सेमीफायनलमध्ये स्थान पक्के करुन लोवलिनाने पदक निश्चित केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शाहरुख खानच्या बहिणीला पाहिलंत का? प्रसिद्धीपासून दूर, काय करते किंग खानची सख्खी बहीण?

सूर्याच्या राशीबदलाने ८ राशींचे अच्छे दिन! नोकरी, पैसा अन् व्यवसायात होणार मोठे बदल

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील लेकाची भरारी! PSI, नायब तहसीलदार ते DySP जिद्दीचा प्रवास; शिवप्रसाद पारवेंची स्वप्नपूर्तीची प्रेरणादायी कहाणी..

Latest Marathi News Live Update : सांगली जिल्हा बँकेतील तारण कर्जाचे सोने बनावट, गोपीचंद पडळकरांचा आरोप

Weather Change Health Tips: पुण्यात पावसाची जोरदार हजेरी; बदलत्या हवामानात आजारी पडू नये म्हणून करा ५ गोष्टी!

SCROLL FOR NEXT