Indian Women's team Twitter
क्रीडा

Tokyo Olympics Day 4 : 'चक दे इंडिया' चा बॅक टू बॅक फ्लॉप शो

भारतीय महिला संघाचा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 Day 4 :ऑलिम्पिक स्पर्धेतील चौथ्या दिवशी तिरंदाजीसह बॅडमिंटन आणि बॉक्सिंग यासह अन्य खेळाच्या मैदानात भारतीय खेळाडू हात आजमावताना दिसणार आहेत. पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या रिंगणात उतरलेल्या भवानी देवीने पहिला सामना जिंकून दमदार सुरुवात केली. पण दुसऱ्या फेरीत तिचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. टेबल टेनिसमध्ये शरथ कमल याने पोर्तुगालच्या टायगो अपोलोनिया याला 4-2 असे पराभूत करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. पण तिसऱ्या फेरीत तोही अडखळला. त्याच्याशिवाय मनिका बत्राचाही स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. महिला हॉकी संघाला दुसऱ्या सामन्यातही पराभवासा सामना करावा लागला. जर्मनी महिला संघाने भारतीय महिला संघाला 2-0 असे नमवले. सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय महिलांचा टोकियो ऑलिम्पिकमधील हा सलग दुसरा पराभव आहे.

महिला हॉकी : जर्मनीकडून भारतीय महिला संघाचा 2-0 असा पराभव

स्विमिंग : साजन प्रकाश सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळण्यास अपयशी

टेबल टेनिस : महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीत ऑस्ट्रियाच्या सोफियाने मनिका बत्राला 8-11, 2-11, 5-11, 7-11 अशा फरकाने पराभूत केलं

बॅडमिंटन : ऑलिम्पिक स्पर्धेत दमदार सलामी देणाऱ्या सुमित नागलचा दुसऱ्या फेरीत पराभव, डॅनियल मेदवेदेव याने त्याला

बॅडमिंटन : पुरुष दुहेरीतील आव्हानही संपुष्टात इंडोनेशियाच्या जोडीनं सात्विकसाईराज रेंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला केले पराभूत

तिरंदाजीत पुरुष सांघिक प्रकारामधून भारतीय संघ बाहेर, दक्षिण कोरियानं सलग तीन सेट जिंकत भारताचे आव्हान संपुष्टात आणले

तिरंदाजी : भारतीय पुरुष संघ आणि कोरिया यांच्यातील सेमी फायनल लढतीला सुरुवात

सेलिंग: पुरुष गटातील लेसर रेडियल रेस 2 मध्ये विष्णू सर्वानन 20 व्या स्थानावर, तिसरी रेस लवरकच सुरु होणार

तिरंदाजांना यश, भारतीय पुरुष संघाने (अतानू दास, प्रवीण जाधव, तरुणदीप रॉय) कझाकिस्तानला पराभूत करत गाठली क्वार्टर फायनल

फ्रान्सच्या प्रतिस्पर्धीने दिली मात

ऐतिहासिक कामगिरीनंतर भवानी देवीचा तलवारबाजी स्पर्धेतील प्रवास संपुष्टात

ऑलिम्पिकमधील आजच्या लढती

आर्चरी : पुरुष सांघिक उपउपांत्यपूर्व फेरी सकाळी 6 वाजता (अतानू दास, प्रवीण जाधव, तरुणदीप रॉय) उपांत्यपूर्व सकाळी , उपांत्य सकाळी 11.47 अंतिम फेरी 10.15 दुपारी 12.45.

बॅडमिंटन : पुरुष दुहेरीचा गटसाखळीतील दुसरा सामना सकाळी 9.10 (सात्विक रेड्डी, चिराग शेट्टी).

बॉक्सिंग : पुरुष मिडलवेट गटात पहिल्या फेरीचा सामना दुपारी 3.06 वाजता (आशीष कुमार).

तलवारबाजी : महिला साबरे प्रकारातील पहिली फेरी पहाटे 5.30 (भवानी देवी).

टेबल टेनिस : पुरुष एकेरीत दुसऱ्या फेरीचा सामना सकाळी 6.30 (अचांता शरथ). महिला एकेरीचा दुसऱ्या फेरीचा सामना सकाळी 8.30 (सुतिर्था. मुखर्जी). दुपारी 2.30 पासून तिसऱ्या फेरीचा सामना (मनिका बत्रा)

नेमबाजी : पुरुषांच्या स्कीट प्रकारातील दुसरा दिवस सकाळी 6.30 (अंगद बाजवा, मैराज खान).

जलतरण : पुरुष 200 मीटर बटरफ्लाय प्राथमिक फेरी दुपारी 3.50 (साजन प्रकाश)

सेलींग : रेस 3 सकाळी 8.35 ( व्ही. सर्वानन), लेसर रेडीयल रेस 3 सकाळी 11.5 (नेत्रा कुमानन).

हॉकी : महिलांचा दुसरा साखळी सामना जर्मनीविरुद्ध सायंकाळी ५.४५.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT