Germany vs India  
क्रीडा

Olympics : 41 वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने रचला इतिहास

जर्मनीने अवघ्या चार मिनिटात दोन गोल डागत भारतीय संघाला पुन्हा एकदा अडचणीत आणले होते.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 IND vs GER Hockey Bronze Medal Game : सामन्यातील 25 व्या मिनिटाला 3-1 पिछाडीवर असताना जबरदस्त कमबॅक करत भारतीय पुरुष हॉकी संघाने जर्मनीला पराभूत करुन दाखवले. या विजयासह भारतीय संघाने ब्राँझ पदकावर नाव कोरले. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 3 गोल करत सामना 3-3 असा बरोबरीत आणला. त्यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने 2 गोल डागून जर्मनीला बॅकफूटवर ढकलले. कांस्य पदकाच्या लढती भारतीय संघाने 5-4 असा विजय नोंदवला. 1980 मध्ये 1 गोलच्या फरकाने भारतीय संघाने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. त्यानंतर तब्बल 41 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केलीये.

भारत आणि जर्मनी यांच्यातील कांस्य पदकाच्या लढतीमध्ये जर्मनी संघाने पहिल्या क्वार्टरमध्येच आघाडी घेतली होती. दुसऱ्या मिनिटालाच जर्मनीकडून तैमूर ओरुझ याने भारतीय संघाचा डिफेन्स भेदत पहिला गोल डागून भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण त्यांचे मनसुबे भारतीय डिफेंडर आणि PR श्रीजेसने उधळून लावले.

दुसऱ्या क्वार्टरच्या सुरुवातीलाच 17 व्या मिनिटाला भारतीय संघाने जर्मनीला प्रत्युत्तर दिले. निलकंठ शर्माने दिलेल्या पासच्या जोरावर सिमरनजीत सिंगने भारतीय संघाला 1-1 बरोबरीचा गोल करुन दिला. भारताने सामन्यात बरोबरी साधल्यानंतर जर्मनीने अवघ्या चार मिनिटात दोन गोल डागत भारतीय संघाला पुन्हा एकदा अडचणीत आणले. त्यानंतर भारतीय संघाला पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नर मिळाला.

हार्दिक सिंगने ऑलिम्पिक स्पर्धेतील दुसरा गोल डागत जर्मनीची आघाडीतील अंतर कमी केले. सिमरनजित सिंगने मिळवून दिलेल्या पेनल्टी कॉर्नरवर रुपिंदर पालचा प्रयत्न जर्मनी गोली अलेक्झांडरने हाणून पाडला पण हार्दिक सिंगने पुन्हा आपल्यातील धमक दाखवून चेंडूला नेट पोस्टमध्ये धाडत भारतीय संघाला 3-3 अशी बरोबरी साधून दिली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये 25, 27 आणि 29 व्या मिनिटाला भारताने गोल डागत पहिल्या हाफमध्ये भारतीय संघाने सामना बरोबरीत आणून जर्मनीच्या आघाडीला सुरुंग लावला. तिसऱ्या क्वार्टरमध्ये रुपिंदर पालने भारतीय संघाला 4-3 अशी आघाडी मिळवून दिली. पेनल्टी स्ट्रोक गोलमध्ये रुपांतरीत करत भारतीय संघाने आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 31 व्या मिनिटाला भारतीय संघाने सामना आपल्या बाजूने फिरवला. त्यानंतर 34 व्या मिनिटाला सिमरनजितने भारताची आघाडी भक्कम केली. गुरजंतसिंगच्या पासवर त्याने गोल डागत भारताला 5-3 अशा आघाडीवर नेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT