India Vs Germany
India Vs Germany  Twitter
क्रीडा

VIDEO : जय हो! 5 मिनिटात 3 गोल; पाहा मॅचचा टर्निंग पॉइंट

सुशांत जाधव

भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात आणत ऑलिम्पिक स्पर्धेत पदकाची कमाई केलीये. 1980 पासून भारतीय संघ ऑलिम्पिकमध्ये लौकिकाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. ध्वजवाहक आणि हॉकी इंडियाचा कॅप्टन मनप्रित सिंगच्या नेतृत्वाखालील संघाने हॉकीचा दबदबा पुन्हा एकदा दाखवून दिलाय.

ब्राँझ पदकासाठीच्या लढतीत पहिल्या क्वार्टरमध्येच जर्मनी संघाने दबदबा निर्माण केला होता. जर्मनीच्या संघाने 1 गोल करत भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. पिछाडीवर असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या क्वार्टरनंतर दिमाखदार खेळ करुन दाखवला. अवघ्या पाच मनिटांत 3 गोल डागून भारतीय संघाने विजयाची स्क्रिप्ट लिहिली. हा क्षण भारतीय हॉकीसाठी अविस्मरणीय असाच होता. या गोलच्या जोरावरच भारतीय संघाने सामन्याला कलाटणी देत पदकावर नाव कोरले.

भारत आणि जर्मनी यांच्यातील कांस्य पदकाच्या लढतीमध्ये जर्मनी संघाने पहिल्या क्वार्टरमध्ये अवघ्या दुसऱ्या मिनिटाला 1-0 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने जर्मनीने केलेल्या गोलचा हिशोब चुकता केला. 17 व्या मिनिटाला निलकंठ शर्माने दिलेल्या पासवर सीमरनजीत सिंगने भारतीय संघाला 1-1 असा बरोबरीचा गोल डागला. जर्मनीने अवघ्या चार मिनिटात दोन गोल डागत भारतीय संघाला पुन्हा एकदा अडचणीत आणले. 25, 27 आणि 29 व्या मिनिटाला भारताने तीन गोल डागल्याचे पाहायला मिळाले. 31 व्या आणि 34 व्या मिनिटाला गोल करुन टीम इंडियाने आपली आघाडी भक्कम केली. पिछाडीवरुन आघाडी मिळवत भारतीय संघाने जर्मनीला 5-4 अशी मात देत कांस्य पदकावर नाव कोरले. 41 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाला अच्छे दिन पाहायला मिळाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT