Deepika Kumar And Pravin Jadahv Twitter
क्रीडा

Tokyo Olympics: जोडी जमली! दीपिका-प्रवीण क्वॉर्टर फायनलमध्ये

आयत्या वेळी भारतीय तिरंदाजी संघाने मिश्र क्रीडा प्रकारातील दीपिकाचा जोडीदार बदलण्याचा निर्णय घेतला.

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची नंबर वन तिरंदाज दीपिका कुमारी (Deepika Kumari) ने महाराष्ट्राच्या प्रवीण जाधवच्या (Pravin Jadahv) साथीनं मिश्र प्रकारात आगेकूच केलीये. तिरंदाजीच्या मिक्सड टीम इवेंटमध्ये या दोघांनी क्वॉर्टर फायनलमध्ये जागा पक्की केलीये. राउंड ऑफ 16 मध्ये भारतीय जोडीने चीनी ताइपे जोडीला पराभूत केले. दीपिका आणि प्रवीण यांनी पिछावडीवरुन दमदार कमबॅक करत सामना जिंकला आणि देशाच्या पदकाच्या आशा कायम ठेवल्या. (Tokyo Olympics 2020 Indian Archers Deepika Kumari Pravin Jadhav Sail Into Quarters In Mixed Team Event)

8 सेटच्या लढतीत चीनी ताइपे जोडीने सुरुवातीला 3-1 अशी आघाडी मिळवली होती. त्यानंतर दीपिका आणि प्रवीणने जबरदस्त कमबॅक करत 5-3 असा विजय नोंदवला. पुढच्या फेरती त्यांचा सामना बांगलादेश आणि कोरिया यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.

नवरा-बायकोची जोडी फुटली

आंतरराष्ट्रीय स्तरावर दीपिका आणि प्रवीण पहिल्यांदा सोबत खेळत आहेत. आतापर्यंत मिक्सड टीम इवेंटमध्ये दीपिका पती अंतनू दास याच्यासोबत मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले होते. ऑलिम्पिकपूर्वी या जोडीने सुवर्ण कामगिरी नोंदवत ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करण्याचे संकेत दिले होते. मात्र आयत्या वेळी भारतीय तिरंदाजी संघाने मिश्र क्रीडा प्रकारातील दीपिकाचा जोडीदार बदलण्याचा निर्णय घेतला. अंतनू दास आणि प्रवीण यांच्यातील ऑलिम्पिक स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर हा निर्णय घेण्यात आला. अनुभवी दीपिकासोबत युवा प्रवीण चांगली कामगिरी करुन दाखवेल, असे भारतीय तिरंदाजी महासंघाला वाटते.

तिरंदाजी क्रीडा प्रकारातील वैयक्तिक इवेंटमध्ये प्रवीणची कामगिरी अंतनू दासपेक्षा सरस राहिली. मिक्सड टीममध्ये भारतीय तिरंदाजी जोडीत बदल करण्यात आला. दीपिका आणि प्रवीण यांना भारताने मैदानात उतरवले आहे. या जोडीने पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Update : महत्त्वाची बातमी! पुण्यात आज 'या' मार्गावरील वाहतूक दुपारी 1 ते 4 च्या दरम्यान बंद राहणार; पर्यायी मार्ग कोणते?

Travel Guide : अनवट संस्कृतीचे दर्शन! आसाम आणि मेघालयचा प्रवास म्हणजे निसर्ग आणि संस्कृतीचा अनुभव

Ramdas Kadam : 'बाळासाहेबांचा मृतदेह २ दिवस मातोश्रीवर ठेवला' ही माहिती रामदास कदमांना कुणी दिली? स्वत: सांगितलं नाव...

Maharashtra tourism : महाराष्ट्राचे दार्जिलिंग! फोफसंडी गावाची या खासियत तुम्हाला माहीत आहे का? जाणून घ्या

Pune Crime: पुण्यातील दौंडमध्ये थरारक घटना! पत्नीचा गळा दाबून खून, नंतर उचललं टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT