Indian Athletics Team Returns Home  ANI
क्रीडा

VIDEO : ऑलिम्पियन खेळाडूंचे जंगी स्वागत!

दिल्लीच्या विमानतळावर भारतीय खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले.

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 : कोरोनाच्या संकटात पार पडलेल्या जगातील मानाच्या स्पर्धेत दिमाखदार कामगिरी केल्यानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतले आहेत. दिल्लीच्या विमानतळावर भारतीय खेळाडूंचे जंगी स्वागत करण्यात आले. दिल्लीतील हॉटेल अशोकामध्ये पदक विजेत्या खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यासाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण (साइ) sports authority of-india कडून खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नवा इतिहास रचलाय. आतापर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक पदकांची कमाई भारतीयांनी करुन दाखवलीये. नीरज चोप्राच्या गोल्डसह मीराबाई चानू आणि रविकुमार दाहियाचे रौप्य आणि बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधू, महिला बॉक्सर लवलिना, कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि भारतीय पुरुष हॉकी संघाने मिळवलेल्या कांस्य पदकासह भारताने एकूण 7 पदके पटकावली आहेत.

ऐतिहासिक कामगिरी करुन परतल्यानंतर गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राचा असा झाला सत्कार

भारताची स्टार बॉक्सर लवलिना हिचा देखील गौरव करण्यात आला.

कुस्तीमध्ये भारताला कांस्य पदकाची कमाई करुन देणाऱ्या बजरंग पुनियाचा सन्मान करण्यात आला.

गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्रा आणि कुस्तीपटू रवि कुमार दाहिया यांनी खास पोझ दिल्याचे पाहायला मिळाले

भारतीय महिला संघाने ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच सेमीफायनपर्यंत धडक मारली होती. यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाच्या लढतीत त्यांना ग्रेट ब्रिटनकडून पराभवाचा सामना करावा लागला असला तरी त्यांची कामगिरी ही कौतुकास्पदच आहे. ऑलिम्पिकमध्ये चौथ्या क्रमांकावर राहत त्यांनी जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर मजल मारलीये. याचा आनंद मायदेशात परतल्यानंतर साजरा करण्यात आला.

ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई करत 41 वर्षांचा दुष्काळ संपवणाऱ्या भारतीय पुरुष संघानेही केक कटिंग करत आनंद व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT