Neeraj Chopra
Neeraj Chopra  File Photo
क्रीडा

Tokyo Olympics : नीरजने भाला फेकला अन् इतिहास घडला!

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने नवा इतिहास रचला. अभिनव बिंद्रानंतर त्याने वैयक्तिक गटात ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी करुन दाखवलीय. त्याच्या गोल्डसह भारताच्या खात्यात 7 पदके जमा झाली आहेत. स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी मीराबाई चानूनं रौप्य पदक कमावले. कुस्तीमध्ये रवि दाहियाने रौप्य पदकाची कमाई केलीये. याशिवाय बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, बॉक्सिंगमध्ये लोवलिना, आणि कुस्तीमध्ये बजरंग पुनियाला कांस्य पदक मिळाले. हॉकी संघानेही कांस्य पदकाची कमाई केलीये.

गोल्फ क्रीडा प्रकारात अदिती अशोकनेही पदकाच्या आशा पल्लवित केल्या होत्. पण चौथ्या आणि अखेरच्या राउंडमध्ये अवघ्या एका स्ट्रोकनं तिला पदकापासून वंचित रहावे लागले. अमेरिकेच्या कोरडा नेलीनं सुरुवातीवपासून शेवटपर्यंत आपला दबदबा कायम ठेवला. यजमान जपानची इनामी मोने आणि न्यूझीलंडची को लेडीया संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर राहिल्या. जपानच्या खेळाडूने अखेरच्या टप्प्यात चांगली कामगिरी केल्यामुळे भारतीय खेळाडू पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडली.

नीरजने पहिल्याच प्रयत्तान 87.03 दुसऱ्या प्रयत्नात त्यात आणखी भर घालत 87.58 मीटर भाला फेकला. ही कामगिरी त्याला सुवर्ण पदक विजेता ठरवण्यासाठी पुरेसी ठरली. त्याने जेवढ्या अंतरावर भाला फेकला त्याच्या आजूबाजूलाही कोणी नव्हते.

बजरंग पुनियाने ब्राँझ पदकावर कोरलं नाव

कुस्ती -

पुरुष 67 किलो वजनी गटात बजरंग पुनिया ब्राँझ मेडलसाठी मैदानात उतरेल. त्याचा सामना दुपारी 4 वाजून पाच मिनिटांनी नियोजित आहे.

भालाफेकमध्ये सुवर्ण पदकाची आस!

भालाफेकपटू निरज चोप्राने क्वालिफायिंग राउंडमध्ये सर्वात लांब भाला फेकून भारताच्या पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत. विशेष म्हणजे तो गोल्ड मेडलचा प्रबळ दावेदार मानला जातोय. दुपारी साडेचार वाजता तो मैदानात उतरणार आहे.

Neeraj Chopra

पदकाची आशा पल्लवित करणाऱ्या अदितीला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले

23 वर्षीय आदिती पदकाच्या शर्यतीत आहे. पहिल्या तीन फेरीनंतर ती दुसऱ्या स्थानावर होती. 18 पैकी 12 व्या संधीत आदिती सिल्वर मेडलिस्टच्या रेसमध्ये कायम

गोल्फ, कुस्ती आणि भालाफेकमधून पदकाची आस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT