Manpreet Singh and MC Mary Kom Twitter
क्रीडा

Olympics : उद्घाटन सोहळ्यातील भारताची दमदार एन्ट्री (VIDEO)

एमसी मेरी कोम आणि मनप्रीत सिंगने केले भारताचे नेतृत्व

सुशांत जाधव

Tokyo Olympics 2020 Opening Ceremony : टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील उद्घाटन कार्यक्रम परंपरेनुसार साजरा झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात वेगवेगळ्या देशातील मोजक खेळाडूंसह ऑफिशियल्सना एन्ट्री देण्यात आली होती. भारताकडून 22 खेळाडू आणि 6 ऑफिशियल्स कार्यक्रमात सहभागी झाले होते. बॉक्सिंग क्रीडा प्रकारातील जागतिक वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये विक्रमी कामगिरी करणाऱ्या एमसी मेरी कोम (MC Mary Kom ) आणि भारतीय हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग (Manpreet Singh) या दोघांनी भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केले. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताकडून महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटातील खेळाडूंना ध्वजवाहक होण्याचा मान मिळवला. (Tokyo Olympics 2020 opening ceremony Manpreet Singh and MC Mary Kom leading Team India Watch Video)

मेरी कोम आणि मनप्रीत सिंग यांच्याव्यतिरिक्त टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सुतिर्था मुखर्जी, जी साथियान हे दोन खेळाडू उद्घाटन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यांच्यासोबत मनिका बत्रा आणि शरथ कमल ही जोडीही सहभागी होणार होती. ओपनिंग सेरेमनीच्या दुसऱ्या दिवशी त्यांना मिश्र दुहेरीतील सामना खेळायचा असल्यामुळे ही जोडी समारंभात सहभागी झाली नाही.

टेनिसपटू अंकिता रैनाने या कार्यक्रमात सहभाग घेतला. सेलिंग क्रीडा प्रकारातील चार खेळाडू, तलवारबाजीतील भवानी देवी, जिम्नॅस्टिक्स क्रीडा प्रकारातील खेळाडू प्रणती नायक, स्वीमर साजन प्रकाश, बॉक्सिंग टीममधील समरजित कौर, लोवलिना. पूजा राणी, अमित, मनिष कौशिक, अविनाश कुमार, सतिश कुमार यांचा समावेश होता. यांच्यासह 6 ऑफिशियल कार्यक्रमात भारतीय संघासोबत होते.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत 127 खेळाडू 18 क्रीडा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या संख्येने भारतीय स्पर्धेक ऑलिम्पिकसाठी गेले आहेत. त्यामुळे यंदाच्या स्पर्धेत अधिक मेडल मिळतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. ओपनिंग सेरेमनीपूर्वीच तिरंदाजी प्रकारातून भारतीय खेळाडूंनी स्पर्धेला सुरुवात केलीये. तिरंदाजीत पदकाची प्रबळ दावेदार असलेली दीपिका कुमारी रँकिंग राउंडमध्ये नवव्या स्थानावर राहिली. मागील स्पर्धेत ती 20 व्या स्थानावर राहिली होती. त्यामुळे तिची कामगिरी उंचावली असून तिच्याकडून पदकाची आशा कायम आहे. मिश्र दुहेरीत दीपिका कुमारी आणि प्रविण जाधव ही जोडी नवव्या स्थानावरच राहिली. एलिमेशन राउंडमध्ये उद्या ही जोडी कशी कामगिरी करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Banjara ST demand: मराठवाड्यात बंजारा समाजाविना निवडणूक जिंकून दाखवावी, हरीभाऊ राठोडांचा इशारा! ST मध्ये समाविष्ट करण्याची मागणी

Latest Marathi News Updates : मुक्ताईनगर तहसील कार्यालय घाणीच्या विळख्यात, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Vice President Oath 2025 : देशाचे १५ वे उपराष्ट्रपती बनले सीपी राधाकृष्णन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली शपथ

Solapur Rain Update:'सोलापूरला पाण्याचा वेढा; १५० नगरांमध्ये पाणीच पाणी', घरांना नाल्याचे स्वरूप; आयुक्त, आमदारांकडून पाहणी

PM Kisan Yojana: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये येणार; नाव यादीत आहे का, कसं तपासाल?

SCROLL FOR NEXT