Mirabai Chanu
Mirabai Chanu  Twitter
क्रीडा

मीराबाई चानूनं रचला इतिहास; भारताला मिळवून दिलं पहिलं पदक

सुशांत जाधव

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानू (Mirabai Chanu wins Silver) ने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक जिंकून दिले. Tokyo Olympics मध्ये 49 किलो वजनी गटात तिने ऐतिहासिक कामगिरीसह रौप्य पदकाची कमाई केलीये. वेटलिफ्टिंग प्रकारात 21 वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपुष्टात आणला. चानूने क्लीन आणि जर्कमध्ये 115 किलो आणि स्नॅचमध्ये 87 किलो असे एकूण 202 किलो वजन उचलत चंदेरी कामगिरी नोंदवली. दुसऱ्या दिवशीच भारताच्या खात्यात पदकाची नोंद झाली. या पदकासह पदतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे. 2 सुवर्ण पदकासह चीन अव्वलस्थानी आहे. वेटलिफ्टिंगपूर्वी 10 मीटर रायफल प्रकारात चीनी महिला खेळाडूने गोल्डन कामगिरी नोंदवली होती.

यापूर्वी कर्णम मल्लेश्वरीने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये कांस्य पदकाची कमाई केली होती. चीनच्या होऊ झिऊईने एकूण 210 किलो (स्नॅच 94 किलो, क्लीन आणि जर्क 116 किलो) वजनासह सुवर्ण पदक पटकावले. इंडोनेशियाची ऐसाह विंडी कांटिकाने एकूण 194 किलो वजन उचलत कांस्य पदकावर नाव कोरले.

2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये चानूची कामगिरी निराशजनक राहिली होती. त्यानंतर तिने सातत्याने कामगिरीत सुधारणा केली. 2017 मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि 2018 मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत चानूने सुवर्ण पदकाची कमाई केली होती.

26 वर्षीय चानूने मागील ऑलिम्पिकमधील उणीवा दूर करुन भारताचे पदतालिकेचे खाते उघडले. आपल्या खेळात टेक्निकलीदृष्ट्या बदल करत चानूने दमदार कामगिरी करुन दाखवली. 1 मे पासून स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग ट्रेनिंगसाठी ती अमेरिकेला गेली होती. खांद्याच्या दुखापतीवरील उपचारानंतर तिने ऑलिम्पिकमध्ये दिमाखदार कामगिरी केलीये.

मीराबाई चानूच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरु झालाय. देशाची मान अभिमानाने उंचावत नारी शक्तीची झलकच तिने जागतिक क्रीडा मंचावरुन दाखवून दिलीये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: कोल्हापुरात PM मोदींच्या भाषणाला सुरूवात

Ujjwal Nikam: "माझा जन्म हनुमान जयंतीचा", 'मविआ' उमेदवाराला कसं रोखणार या प्रश्नावर निकमांचा थेट युक्तिवाद

Ujjwal Nikam: उज्ज्वल निकम यांना भाजपकडून मुंबई उत्तर-मध्यमधून उमेदवारी जाहीर; पुनम महाजन यांचा पत्ता कट

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईला दुसरा धक्का! रोहितपाठोपाठ ईशान किशनही परतला माघारी

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

SCROLL FOR NEXT