Bajrang Punia
Bajrang Punia  File Photo
क्रीडा

Olympics : बजरंगबली की जय; पुनियानं भारताला मिळवून दिलं ब्राँझ

सुशांत जाधव

ऑलिम्पिक स्पर्धेत पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि कझाकिस्तानच्या दाऊलेत नियाझबेकोव यांच्यात ब्राँझ पदकासाठी लढत झाली. सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत बजरंग पुनियाने ब्राँझ पदकावर नाव कोरले. त्याने 8-0 अशा फरकाने एकतर्फी विजय नोंदवला. सुवर्ण पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंगला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवातून सावरुन त्याने अखेर ब्राँझ पदकासह भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली.

बजरंगने सुरुवातीपासूनच मॅचवर पकड मजबूत केली होती. प्रतिस्पर्ध्याला त्याने कोणतीही संधी दिली नाही. बजरंगने दौलतला मॅचमध्ये आघाडी घेऊ दिली नाही. त्याने 8-0 अशा फरकाने दौलतचा पराभव केला. बजरंग याच्याकडून देशाला सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. त्याची खेळीही त्याला साजेशीच होती. पण, सेमीफायनलमध्ये इराणच्या हाजी अलीएवने त्याला चितपट केले. मॅच एकतर्फी झाली होती. पण, त्याने ब्राँझ पदक मिळवून देशाचा गौरव वाढवला आहे.

सेमीफायनलमध्ये तीनवेळी विश्वविजेता ठरलेल्या हाजी अलीएवच्या हाती बजरंग पुनियाचा 5-12 असा पराभव झाला होता. असे असले तरी बजरंगने भारताला कुस्तीमध्ये दुसरे पदक मिळवून दिले आहे. याआधी रवि दहियाने फायनलपर्यंत धडक मारत सिल्वर मेडल पटकावलं होतं. भारताने आतापर्यंत हॉकी, कुस्ती, बॉक्सिंग खेळामध्ये आतापर्यंत एकूण 6 पदके नावावर केले आहेत. भारताला निरज चोप्राकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : ''...त्या बैठकीला मी हजर होतो, मनमोहन सिंहांना मी विरोध केला होता'', मोदी नेमकं काय म्हणाले?

Rishabh Pant Vs Sanju Samson : टी 20 वर्ल्डकपसाठी ऋषभ पंत की संजू सॅमसन कोण आहे टीम इंडियाची पहिली पसंती?

'बजरंगी भाईजान' मधील मुन्नीने केली ट्रोलर्सची बोलती बंद ; दहावीला मिळाले इतके गुण

Modi Rally in Kalyan: पहिल्या 100 दिवसांच्या व्हिजनमध्ये 25 दिवस वाढवणार; मोदींनी केलं तरुणांना आवाहन

CAA Certificates: केंद्राकडून CAAची प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात; कोणाला मिळालं पहिलं प्रमाणपत्र? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT