India Women Hockey Team
India Women Hockey Team  
क्रीडा

महिला हॉकी संघाची ब्राँझपदकासाठी लढत

सकाळ वृत्तसेवा

बर्मिंगहॅम : टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझपदक थोडक्यासाठी हुकल्यानंतर भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्येही नशिबाने साथ दिली नाही. भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये निर्धारित वेळेमध्ये १-१ अशी बरोबरी झाल्यानंतर निकालासाठी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब करण्यात आला. यामध्ये ऑस्ट्रेलियाने ३-० अशा फरकाने विजय संपादन केला. त्यामुळे भारताला महिला हॉकी संघाला आता ब्राँझपदकासाठी लढावे लागणार आहे.

ऑस्ट्रेलियाने या लढतीचा सुरुवात चांगली केली. रेबेका ग्रिनर हिने १० व्या मिनिटाला गोल करीत त्यांना आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारतासाठी वंदना कटारियाने मोलाची कामगिरी बजावली. ४९ व्या मिनिटाला तिने गोल करीत भारतासाठी १-१ अशी बरोबरी साधली. ही बरोबरी ६० मिनिटांच्या खेळानंतरही कायम राहिली.

आता न्यूझीलंडशी सामना

भारतीय महिला हॉकी संघाने २००२ राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक, तर २००६ राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक पटकावले आहे; पण याव्यतिरिक्त भारतीय महिला हॉकी संघाला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकता आलेले नाही. १९९८ व २०१८ मध्ये भारतीय महिला हॉकी संघाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. यंदाच्या राष्ट्रकुलमध्ये भारतीय संघासमोर ब्राँझपदकासाठीच्या लढतीत न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया - इंग्लंडमध्ये सुवर्णपदकासाठी लढत रंगणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT