Neeraj Chopra And Arshad Nadeem E Sakal
क्रीडा

भारत-पाक युद्ध रंगवू नका; गोल्डन बॉय नीरजची देशवासीयांना विनंती

माझ्या नावाचा वापर करुन चुकीच्या गोष्टी पसरवू नका, अशी विनंती त्याने देशवासियांना केलीये.

सुशांत जाधव

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला सुवर्ण क्षणाची अनुभूती देणाऱ्या नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) एक विधान सध्या चर्चेत आहे. एका मुलाखतीमध्ये त्याने पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदिमचा (Arshad Nadeem) उल्लेख केला होता. यावरुन सोशल मीडियावर भारत-पाकिस्तान वादाचा मुद्दा रंगवण्यात येत आहे. नीरज चोप्राने यावर नाराजी व्यक्त केलीये. त्याने ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केलाय. माझ्या नावाचा वापर करुन चुकीच्या गोष्टी पसरवू नका, अशी विनंती त्याने देशवासीयांना केलीये.

ऑलिम्पिक गोल्डन बॉय नीरज चोप्राने ट्विटच्या माध्यमातून एक व्हिडिओ शेअर केलाय. यात त्याने म्हटलंय की, मी सर्वांना विनंती करतो की, माझ्या वक्तव्याचा चुकीचा अंजेंडा पुढे नेण्यासाठी वापर करुन नये. खेळाच्या माध्यमातून एकीचा संदेश दिला जातो. खेळातील नियम समजून घ्या. उगाच नको त्या अफवा पसरवू नका.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या नीरज चोप्राने एका मुलाखतीमध्ये स्पर्धेदरम्यानचा एक किस्सा शेअर केला होता. अंतिम फेरीतील पहिल्या प्रयत्नात भाला फेकताना गडबड गोंधळ झाल्याचे नीरजने म्हटले होते. ज्यावेळी माझा नंबर आला त्यावेळी भाला मिळत नव्हता. शोधाशोध केल्यानंतर तो पाकिस्तानी खेळाडू अर्शद नदिमच्या हाती असल्याचे लक्षात आले. त्याच्याकडून भाला घेतला आणि मग गडबडीनेच पहिल्या प्रयत्नात भाला फेकला, असे नीरजने म्हटले होते.

नीरजने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीनंतर स्पर्धेदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. चित्रपट दिग्दर्शक अशोक पंडित यांनी देखील नीरजचा हा व्हिडिओ शेअर केलाय. खेळाच्या मैदानातही पाकिस्तानकडून कट रचला गेला. नीरज चोप्राबाबत घडलेला प्रकार पाकच्या नापाक इराद्याचा भाग होता, अशा प्रतिक्रिया या व्हिडिओवर उमटत आहेत.

मात्र नीरज चोप्राने यावर पडदा टाकला आहे. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करुन खोट्या गोष्टी पसरवू नका. खेळाकडे चांगल्या भावनेनं पाहायला शिका. खेळ समजून घ्या, असे नीरजने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT