Deepika Kumari 
क्रीडा

Olympics: तिरंदाज दीपिकाकुमारीची जबरदस्त कामगिरी, उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

दीपिकाकुमारी सध्या महिला तिरंदाजांमध्ये जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे.

दीनानाथ परब

टोक्यो: ऑल्मिपिकमधून (tokyo olympics) भारतासाठी एक चांगली बातमी आहे. सध्या प्रचंड फॉर्ममध्ये असलेली भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिकाकुमारीने (deepika kumari) रशियाच्या क्सेनिया पेरोवाचे (ksenia perova) पराभव करुन उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. दीपिकाकुमारी सध्या महिला तिरंदाजांमध्ये (archery) जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे. ब्राझीलमध्ये झालेल्या रियो ऑलिम्पिकमध्ये सांघिक प्रकारात क्सेनिया पेरोवाने रौप्यपदक मिळवले होते. (tokyo olympics in archery event deepika kumari beat russias ksenia perova enters quarterfinals dmp82)

काल अतानु दासने कोरियाच्या अव्वल तिरंदाजाचा पराभव करत, अशाच प्रकारचा धक्का दिला होता. दीपिकाकुमारीने आज शूट ऑफच्या फेरीत अशाच प्रकारच्या विजयाची नोंद केली. दीपिका कुमारीने पहिला सेट २८-२४ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये क्सेनिया पेरोवाने पुनरागमन केले. २६-२७ अवघ्या एका गुणाच्या फरकाने दीपिकाने हा सेट गमावला.

तिसऱ्या सेटमध्ये दीपिकाने २८-२७ ने विजय मिळवत २-१ अशी आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये बरोबरी झाली. त्यानंतर क्सेनियाने पाचवा सेट २५-२६ असा जिंकला. पाच सेटनंतर दोघींचे पाच गुण झाल्यामुळे अखेर शूट ऑफचा निर्णय झाला. या शूट ऑफ राऊंडमध्ये क्सेनियाने सात गुण मिळवले तर दीपिकाने अचूक नेम साधत १० गुण मिळवत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, Video: वैभव सूर्यवंशीची दोन सिक्ससह दणक्यात सुरुवात, पण मग कशी पडली विकेट? माघारी जाताना झाला भावूक

तुम्हीच सांगा उपवास कसा करायचा? सणासुदीच्या काळात भगरीच्या किंमतीत दुप्पटीने वाढ, साबुदाणाही महागला, पण किती?

Nagpur RTO Crackdown: नागपूरमध्ये HSRP नसलेल्या वाहनांवर RTOची धडक कारवाई; तीन दिवसांत १७२ वाहनांवर ई-चलान, १.७२ लाखांचा दंड

Melghat Teachers Scam: मेळघाटातील कंत्राटी शिक्षक भरतीत मोठा घोळ? आरटीई व संचमान्यतेला हरताळ, प्रहार संघटनेचा पारदर्शक प्रक्रियेचा आग्रह

Nagpur Education : मनपाच्या नव्या इंग्रजी शाळा अजूनही कागदावरच; आठवडा उलटला तरी प्रवेशप्रक्रिया ठप्प, पालक संभ्रमात

SCROLL FOR NEXT