tokyo olympics  file photo
क्रीडा

जपानमध्ये भारतीयांना नो एन्ट्री; खेळाडूंसाठी IOA आखणार प्लॅन

दोन्ही स्पर्धेत मिळून जवळपास 1 लाख 80 हजार अधिकारी टोकियो दौऱ्यावर येणार होते.

सुशांत जाधव

Tokyo Olympics : जगातील मानाची स्पर्धा समजली जात असलेल्या टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेला अवघे 2 महिने उरले आहेत. स्पर्धेपूर्वी आयोजन समितीने एक मोठा निर्णय घेतलाय. ऑलिम्पिक आणि पॅराऑलिम्पिकसाठी परदेशातून जपानमध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येत 60 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. दोन्ही स्पर्धेत मिळून जवळपास 1 लाख 80 हजार अधिकारी टोकियो दौऱ्यावर येणार होते. (tokyo olympics japan india travel ban olympics organizers cut entry isiting officials)

ऑलिम्पिक समितीच्या नव्या निर्णयानुसार आता केवळ 80 हजार अधिकाऱ्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. दुसरीकडे भारताच्या अडचणी वाढल्या आहेत. भारतातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे जपानने भारतावर अनिश्चितकाळासाठी प्रवास बंदीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंसमोर आणखी एक नवे आव्हान समोर उभे राहिले आहे. समर ऑलिम्पिक स्पर्धा 24 जुलै तर पॅराऑलिम्पिक गेम्स 24 ऑगस्टपासून नियोजित आहेत.

ऑलिम्पिकमध्ये जवळपास 15 अ‍ॅथलिट्सचा सहभाग

टोकियो ऑलिम्पिक आयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुतो (CEO Toshiro Muto) म्हणाले की, स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अ‍ॅथलिट्समध्ये कोणताही बदल होणार नाही. जवळपास 15 हजार अ‍ॅथलिट्स स्पर्धेत सहभागी होणार आहेत. केवळ परदेशातून स्पर्धेसाठी उपस्थितीत राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या परिस्थितीनुसार यात आणखी कपात होऊ शकते, असेही ते म्हणाले.

परदेशातून सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येत 60 टक्के कपात

यापूर्वी गुरुवारी आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समितीचे प्रमुख अँड्र्यू पार्संस यांनी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या अधिकाऱ्यांच्या संख्येत घट करण्याची घोषणा केली होती. अत्यावशक वर्गात मोडणाऱ्या अधिकाऱ्यांनाच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाणार आहे.

जपानमधील अनेक डॉक्टरांनी ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनाच्या मुद्यावरुन बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे. सध्याच्या घडीला कोरोनामुळे लोक जीव गमावत असताना स्पर्धा भरवणे योग्य वाटत नाही. स्पर्धेच्या आयोजनामुळे जपानच्या लोकांमध्येही असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होईल, अशी भिती डॉक्टरांनी व्यक्त केलीये.

जापानने भारत, पाकिस्तान आणि नेपाळहून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी

जपानने शुक्रवारी भारत, नेपाळ आणि पाकिस्तानहून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. हे निर्बंध कधीपर्यंत कायम राहणार यासंदर्भात कोणतेही भाष्य जपानने केलेले नाही. या निर्णयामुळे इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनच्या (IOA) अडचणी वाढल्या आहेत. IOA ने यंदाच्या स्पर्धेसाठी 13 स्पोर्ट्स प्रकारात 100 हून अधिक अ‍ॅथलिट्स पाठवण्याची तयारी केली आहे. बॅन कायम राहिला तर भारतीय खेळाडूंना दुसऱ्या देशात जाऊन त्याठिकाणी सराव करावा लागेल. याशिवाय तेथूनच त्यांना ऑलिम्पिकसाठी रवाना व्हावे लागू शकते. सध्याच्या घडीला जपानने कोणत्याही देशातील कॅम्पला रेड लिस्टमध्ये टाकलेले नाही. त्यामुळे तुर्तास देशातील सर्व खेळाडू एका छताखाली येऊन ऑलिम्पिकला जाण्याचा मार्ग खुला आहे.

अ‍ॅथलिट्सना सुरक्षित स्थानावर पाठवण्यास तयार

जपानने घेतलेल्या निर्णयासंदर्भात कोणतीही माहिती नाही, असे IOA चे प्रमुख नरिंदर बत्रा यांनी एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले. ते म्हणाले की जर परिस्थिती बिकट झाली तर खेळाडूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी आम्ही तयार आहोत. ट्रॅव्हल बॅनच्या परिस्थितीत खेळाडूंना जास्तीत जास्त 14 दिवस क्वांरटाईनच्या प्रक्रियेतून जावे लागेल. परिस्थितीत खूपच चिंताजनक असेल तर खेळाडूंना महिन्यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी पाठवण्याची व्यवस्था केली जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, तर उद्धव ठाकरेंवर टीका, मराठी विजय मेळाव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

Video: दिवसाढवळ्या 'हॉटेल भाग्यश्री'ची फसवणूक! 'ही' आयडिया करुन लोक पैसे उकळायला लागले अन् फुटक खाऊ लागले

Viral Video: लग्नासाठी मुलगा आहे का? मुलीची अनोखी मागणी, दारुडा हवा नवरा, ५ लाख देणार हुंडा! ही 'डील' मिस करू नका!

Palghar News: महिनाभर 'या' पालघर मार्गावर अवजड वाहनांना बंदी, उल्लंघन करणाऱ्यांना प्रशासनाचा अलर्ट; काय आहेत पर्यायी मार्ग?

Latest Maharashtra News Updates : "एक मराठी प्रेमी,दुसरा खुर्चीप्रेमी" शिंदेंच्या शिवसेनेचं विजयी मेळाव्यानंतर ट्विट व्हायरल

SCROLL FOR NEXT