क्रीडा

जिंकलस भावा! सिमरनजीतच्या खिलाडूवृत्तीची चर्चा तर होणारच

सुस्मिता वडतिले

सामन्यानंतर सिमरनजीतचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

Tokyo Olympics 2020: भारतीय मेन्स हॉकी टीमने (Indian men's hockey team) ( टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला. भारतीय हॉकी संघाने 41 वर्षांपासून ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकले नव्हते. मनप्रीत सिंग अँड कंपनीने हा दुष्काळ संपवला. दोन गोल करणाऱ्या भारताच्या या विजयात सिमरनजीत सिंगने मोलाची भूमिका बजावली. सामन्यानंतर सिमरनजीतचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

भारतीय मेन्स हॉकी टीमला आपल्या खेळाने जिंकून देणाऱ्या सिमरनजीत सिंगनेही करोडो क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. सामना संपल्यानंतर जर्मन खेळाडू निराश होऊन डोक्यावर हात ठेवून मैदानावर बसलेले दिसले. सिमरनजीतने जिंकल्याचा आनंद साजरा केला, पण यादरम्यान तो जर्मन खेळाडूचे सांत्वन करतानाही दिसला.

शेवटच्या काही सेकंदात जर्मनीला पेनल्टी कॉर्नर मिळाला. जर्मनीला सामन्यात येण्याची ही अखेरची संधी होती. पण गोलकिपर पी आर श्रीजेशने हा त्यांचे इरादे हाणून पाडले. भारतीय खेळाडूंसह टीव्हीवर हा ऐतिहासिक सामना पाहणाऱ्या कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्यात आनंद अश्रूचा क्षण पाहायला मिळाला. भारताने या विजयासह टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले.

जर्मनीवर 5-4 असे रोमांचक विजय मिळवण्यात भारतीय संघातील अनेकांनी मोलाचा वाटा उचलला. 17 आणि 34 व्या मिनिटांत सिमरनजीत सिंग, 27 मिनिटाला हार्दिक सिंग, 29 व्या मिनिटांला हरमनप्रीत सिंग आणि 31 मिनिटांत रुपिंदर पाल सिंग यांनी गोल डागले. गोलकिपर श्रीजेशनं प्रतिस्पर्धी संघाच्या अनेक पेनल्टी रोखून भारताच्या विजय निश्चित करण्यात मोलाचा वाटा उचलला.

आठ वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेली भारतीय संघ एकावेळी 1-3 ने पिछाडीवर होता. पण दबावातून टीम इंडियाने दमदार कमबॅक केले. आठ मिनिटांत चार गोल करत संघाने विजय मिळवला. जागतिक क्रमवारीत चौथा क्रमांकावर असलेल्या जर्मनीकडून सामन्याच्या दुसऱ्या मिनिटाला तैमुर ओरुझ याने आघाडी मिळवून दिली होती. 24 व्या मिनिटाला निकलास वेलेन त्यापाठोपाठ 25 व्या मिनिटाला बेनेडिक्ट फर्क आणि सामन्यातील 48 व्या मिनिटाला लुकास विंडफेडर यांनी गोल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

MPSC Mega Bharti : एमपीएससीकडून 2,619 जागांसाठी मोठी भरती! 'या' पदांसाठी होणार परीक्षा, ऑनलाईन अर्ज सुरू; सीमाभागातील उमेदवारांनाही संधी

Mumbai News: फेरीवाला परवान्यांवर न्यायालयाचे ताशेरे, एकाच कुटुंबाला अनेक परवाने; पालिकेला फटकारले

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

SCROLL FOR NEXT