Neeraj Chopra 4
Neeraj Chopra 4 Instagram
क्रीडा

नीरज, तुझं नाव भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहीलं जाईल!

विराज भागवत

पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती कोविंद, क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडून नीरजचं तोंडभरून शुभेच्छा

Tokyo Olympics: ऑलिम्पिक स्पर्धेच्या पुरुष भालाफेक (Men's Javelin प्रकारात भारताचा तरणाबांड नीरज चोप्रा याने इतिहास रचला. पात्रता फेरीतील कामगिरीत आणखी सुधारणा करत त्याने यंदाच्या स्पर्धेत भारतीयांना सोनेरी क्षणाची अनुभूती देणारी कामगिरी केली. भाला फेकताना सर्वात लांब अंतर गाठण्याची किमया साधली. यंदाच्या ऑलिम्पिकमधील हे भारताचे पहिलेच सुवर्णपदक ठरले. तर इतिहासातील हे भारतासाठी केवळ दुसरे सुवर्णपदक ठरले. 2008 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत अभिनव बिंद्रा याने शूटिंगमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. त्यानंतर भारताला वैयक्तिक खेळांमध्ये सुवर्ण मिळवून देणारा नीरज हा केवळ दुसरा भारतीय खेळाडू ठरला.

नीरज चोप्रा आणि जर्मनीचा जोहान्स वेट्टर यांच्यात चुरस पाहायला मिळेल असं वाटत होते. पण जर्मनीच्या खेळाडूसह अन्य कोणत्याही खेळाडूला त्याच्या जवळपासही जाता आले नाही. नीरजच्या सुवर्णकामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कौतुक केले.

असा रंगला नीरजचा आजचा प्रवास

भालाफेकच्या पात्रता फेरीत टॉपर म्हणून सिलेक्ट झालेल्या नीरजने अंतिम सामन्यात दमदार सुरूवात केली. त्याने पहिल्याच प्रयत्नात 87.03 मीटर लांब भालाफेक केली. त्यापाठोपाठ दुसऱ्या प्रयत्नात त्याने आणखी लांब म्हणजेच 87.58 मीटर भाला फेकून प्रतिस्पर्धांची दांडी गुल केली. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात तो 76.79 मीटर इतकाच भालाफेक करू शकला. चौथ्या आणि पाचव्या प्रयत्नात त्याचा फाऊल झाला. पण त्याने सुरूवातीच्या दोन फेकींच्या जोरावर भारताला सुवर्णपदक मिळवून दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला तिसरा धक्का, कर्णधार केएल राहुलपाठोपाठ दीपक हुड्डाही आऊट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT