क्रीडा

Olympics - रेसवेळी अपघात, अ‍ॅथलिट ट्रॅकवरून थेट ICUमध्ये; VIDEO

सकाळ डिजिटल टीम

सेमीफायनलमधील तिसऱ्या रेसवेळी क्रॅश झाल्यानं ट्रॅकवर दोन तीन स्पर्धक एकमेकांवर आदळले.

टोकियो - अमेरिकेचा स्टार BMX रेसर आणि रिओ ऑलिम्पिक चॅम्पियन कॉनर फिल्ड्सचा रेसिंगवेळी अपघात झाला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये झालेल्या या अपघातानंतर कॉनर फिल्ड्सला थेट आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे. सेमीफायनलमधील तिसऱ्या रेसवेळी क्रॅश झाल्यानं ट्रॅकवर दोन तीन स्पर्धक एकमेकांवर आदळले. यात कॉनर फिल्ड्स जखमी झाला असून त्याच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याची माहिती समजते.

रेसर अपघातात जखमी झाला असला तरी त्याने आधीच फायनलसाठी पात्रता पूर्ण केली होती. मात्र आता अपघातानंतर त्याला आयसीयूमध्ये नेण्यात आलं आहे. कॉनर फिल्ड्सची आई लिसा यांनी त्याच्या प्रकृतीची माहिती देताना सांगितलं की, कॉनर फिल्ड्सला आयसीयूतून हाय लेव्हल केअरमध्ये शिफ्ट कऱण्यात आलं आहे.

दरम्यान, सीटी स्कॅन केल्यानंतर मेंदूत आणखी जखम आणि रक्तस्राव झालेला नसल्याचं म्हटलं आहे. लिसा यांनी फेसबुकवर एक पोस्टही शेअर केली आहे. त्यात म्हटलं की, 28 वर्षांच्या फिल्ड्ससाठी प्रार्थना केल्याबद्दल सर्वांचे आभार. कॉनर फिल्ड्सचे वडिल माइक यांनी युएसए टुडे स्पोर्ट्शी बोलताना म्हटलं की, कॉनरची प्रकृती सुधारत आहे. त्याला शुद्ध असून तो कुठे आहे हे माहिती आहे. लोकांना ओळखत असल्याचही वडिलांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bengaluru Highway: पुणे-बंगळूर महामार्गावर वाहतूक कोंडी; दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा; तावडे हॉटेल चौकात गर्दी, वाहनधारक त्रस्त

Ganesh Naik Eknath Shinde : ‘बाटलीतली भूतं बाहेर काढली, आता अंगाशी येत आहेत’; गणेश नाईक-एकनाथ शिंदेंमधील वाद पुन्हा उफाळला

Kolhapur Politics: मंत्री हसन मुश्रीफ-डॉ. विनय कोरे यांच्यात खलबते; बंद दाराआड तासभर चर्चा, तपशील गुलदस्त्यात

IND vs SL Final: भारत-श्रीलंका फायनलमध्ये रंगणार थरार! शेफाली-दीप्ती ठरणार गेमचेंजर; आठव्यांदा ट्रॉफी जिंकण्याची संधी

Kolhapur Accident: मृत्यूने गाठले, घर-संसाराचे स्वप्न अपूर्ण राहिले; प्लंबिंगचे साहित्य घेऊन येताना महेशच्या दुचाकीची थांबलेल्या टेम्पोला धडक

SCROLL FOR NEXT