Bhavina Patel Twitter
क्रीडा

Paralympics : बालपणी गमावले पाय; भाविनाने उंचावली देशाची मान

बालपणापासूनच संघर्षमय आयुष्याचा सामना करणाऱ्या या लेकीनं जिद्दीच्या जोरावर सर्व गोष्टींवर मात करुन इतिहास घडवता येतो, हे दाखवून दिले आहे.

सुशांत जाधव

गुजरातची भाविना पटेल हिने टेबल टेनिसमधील महिला एकेरीत क्लास-4 गटात फायनलमध्ये प्रवेश केलाय. पॅरालिंपिक स्पर्धेत पदक निश्चत करताच टेबल टेनिसमध्ये असा पराक्रम करणारी ती देशातील पहिलीच पॅरालिंपिक खेळाडू ठरलीये. तिचा इथपर्यंतचा प्रवास सहज आणि सोपा मुळीच नव्हता. ज्यावेळी ती अवघ्या 1 वर्षांची होती त्यावेळी चालण्याचा प्रयत्न करताना ती कोसळली. यात तिला पायला लकवा मारला. काही दिवसांनी याच आजारात तिने दुसरा पायही गमावला. बालपणापासूनच संघर्षमय आयुष्याचा सामना करणाऱ्या या लेकीनं जिद्दीच्या जोरावर सर्व गोष्टींवर मात करुन इतिहास घडवता येतो, हे दाखवून दिले आहे.

भाविना तीन भावंडात सर्वात छोटी

भाविना पटेल ही गुजरातमधील वडनगर येथील सुंडिया गावातील रहिवासी आहे. तिचे वडील हंसमुख भाई पटेल यांच्या गावातच एक छोटे दुकान आहे. तिघा भावंडात भाविना ही सर्वात छोटी आहे. भाविकाच्या वडिलांनी एका मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, तिच्याशिवाय दोन्ही मुलं सदृढ आहेत. वर्षांची असताना भाविकाला लकव्यामुळे पाय गमावले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर ती कुबड्या घेऊन चालू लागली.

पॅरा टेबल टेनिस खेळाकडे कशी वळली भाविना

भाविनाने संस्कृतमधी उच्च शिक्षण घेतले आहे. ती ज्यावेळी दिव्यांग स्कूलमध्ये कॉम्प्युटर शिकायला जायची त्यावेळी गुजरातमधील पॅरा टेबल टेनिसचे कोचने तिला प्रोत्साहन दिले. व्हिलचेअरवरील स्पर्धेत तिने बाजी मारली आणि मग तिने कधीच मागे वळून पाहिले नाही. तिने आतापर्यंत 27 वेगवेगळ्या देशांतील स्पर्धेत सहभाग घेत अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवल्या आहेत.

विवाहानंतर पती अन् सासरच्या मंडळींची मिळाली साथ

दिव्यांग खेळाडूंमध्ये लक्षवेधी कामगिरी करणाऱ्या भाविनाला स्पोर्ट्स कोट्यातून बीमा निगममध्ये नोकरी मिळाली. तीन वर्षांपूर्वीच तिचा विवाह देखील झाला. विवाहानंतर तिच्या सासरच्या मंडळींनी आणि पतीने तिला खेळासाठी प्रोत्साहन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT