Bhavina Patel  Twitter
क्रीडा

Paralympics: भाविनानं रचला इतिहास, टेबल टेनिसमध्ये भारताचं मेडल पक्के

टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचे पहिले मेडल पक्के करणारी ती पहिली खेळाडू ठरलीये.

सुशांत जाधव

Tokyo Paralympics 2020: टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत भारताची टेबल टेनिसपटू भाविना पटेल (Bhavina Patel) हिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलीये. सेमीफायनलमध्ये जागा पक्की करत तिने भारताचे पहिले मेडल पक्के केले आहे. महिला एकेरीतील क्लास-4 च्या क्वार्टर फायनल लढतीत तिने सर्बियाच्या राकोविचला 3-0 अशी मात दिली. भाविनाने ही लढत 11-5, 11-6, 11-7 अशी जिंकत भारताचे पदक निश्चित केले. पॅरा टेबल टेनिस क्रीडा प्रकारात पहिल्या चारमध्ये प्रवेश केल्यामुळे तिला आता किमान ब्राँज पदक मिळणार हे पक्के झाले आहे.

टोकियोतील पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचे पहिले मेडल पक्के करणारी ती पहिली खेळाडू ठरलीये. कामगिरीतील सातत्य कायम राखत सर्वोच्च पदक मिळवण्यासाठी ती प्रयत्नशील असेल. सेमीफायनलमध्ये प्रवेश करत पदक निश्चित केल्यानंतर भाविनानं देशवासियांचे आभार मानले. देशवासियांची मी खूप खूप आभारी आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी इथेपर्यंत पोहचले आहे. सेमीफायनलमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यासाठी प्रयत्नशील असेल, असे तिने म्हटले आहे.

जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानी असलेल्या भाविनाने राउंड 16 मध्ये ब्राझीलच्या ओलिविरा हिला मात दिली होती. पहिला सेट तिने 12-10 तर दुसरा सेट 13-11 असा जिंकला होता. क्वार्टर फायनलपूर्वी भाविनाने ग्रेट ब्रिटनच्या मेगन शॅकल्टॉनचा 11-7, 9-11, 17-15, 13-11 अशा फरकाने विजय नोंदवला होता. भारताकडून पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिसमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Decision Impact: ट्रम्पचा डाव उलटणार? TCS, Infosys, Wiproसह भारतीय IT कंपन्यांना झटका देताना अमेरिकाच अडचणीत?

Ranji Trophy : रवींद्र जडेजाचे खणखणीत शतक, रिंकू सिंगनेही पार केला तिहेरी आकडा; दोघांची फटकेबाजी अन् प्रतिस्पर्धी गार...

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींचा ज्ञानेश कुमार यांना इशारा; म्हणाले, ‘तुमची झोप उडाली आहे, आम्ही तुम्हाला सोडणार नाही’

Indian Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची मोठी संधी! ३,५४८ जागा; कोण अर्ज करू शकतं जाणून घ्या

भाजप नेत्याची काठ्या-दगडांनी मारहाण करत हत्या, ५-६ जणांनी घेरलं अन्....; धक्कादायक VIDEO समोर

SCROLL FOR NEXT