PM Modi And Bhavina Patel E Sakal
क्रीडा

गो फॉर गोल्ड... PM मोदींकडून भाविनाला शुभेच्छा!

भाविना पटेलनं टोकियो स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

सुशांत जाधव

Tokyo Paralympics 2020 : भारताची पॅरालिंपिक महिला खेळाडू भाविना पटेल (Bhavina Patel) हिने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केलीये. टेबल टेनिस एकेरीच्या क्लास 4 क्रीडा प्रकारातील सेमीफायनलमध्ये भाविना पटेलनं चीनच्या झँग मिआओ हिला 3-2 अशी मात देत फायनल गाठलीये. 29 ऑगस्ट रोजी ती यिंग झोउला टक्कर देणार आहे. ऐतिहासिक कामगिरीनंतर भाविनावर कौतुकाचा वर्षाव होत असून तिने गोल्डन कामगिरी करावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी देखील तिच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. भाविना पटेलनं टोकियो स्पर्धेत केलेली कामगिरी अभिमानास्पद आणि प्रेरणादायी असल्याचे मोदींनी म्हटले आहे. मोदींनी ट्विटवर लिहिलंय की, भाविना पटेल खूप उत्तम खेळली. संपूर्ण देश तुझ्या यशाची प्रार्थना करत आहे. अंतिम सामन्यात खेळताना कोणताही दबावात खेळण्याची आवश्यकता नाही, असा सल्लाही मोदींनी तिला दिलाय.

जागतिक क्रमवारीत 12 व्या स्थानावर असलेल्या भाविना पटेल हिने सेमीफायनल लढतीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या चिनी खेळाडूला पराभवाचा दणका दिला. चिनी खेळाडूने आक्रमक सुरुवात करत पहिला सेट 11-7 अशा फरकाने आपल्या नावे केला होता. त्यानंतर भाविनाने जबरदस्त कमबॅक केले. दुसऱ्या सेटमध्ये तिने याच फरकाने बाजी मारत बरोबरी साधली. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये 11-4 असा जिंकत भारतीय टेनिस स्टारने आघाडी घेतली. चौथ्या सेटमध्ये चिनी खेळाडूने पुन्हा बरोबरी साधली. सेमीफायनलमध्ये बरोबरीत आलेला सामन्यातील अंतिम सेटमध्ये 11-8 असा जिंकत भाविनाने अंतिम फेरी गाठली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT