Narendra Modi And Bhavina Patel  Twitter
क्रीडा

Paralympics: PM मोदींनी चंदेरी गर्लला कॉल करुन दिल्या शुभेच्छा!

भाविनाची कामगिरी ऐतिहासिक असल्याचे मोदींनी म्हटलंय.

सुशांत जाधव

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भाविनाबेन पटेल या टेबल टेनिसपटूचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले आहे. भाविनाने टेबल टेनिसमधील क्लास 4 क्रीडा प्रकारात भारताला रौप्य पदकाची कमाई करुन दिलीये. भाविनाची कामगिरी ऐतिहासिक असल्याचे मोदींनी म्हटलंय.

भाविनाने रौप्य पदकावर नाव कोरल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉल करुन तिचे अभिनंदन केले. भविष्यातील कारकिर्दीसाठीही मोदींनी भाविकाला शुभेच्छा दिल्या आहेत. जीवनात तिने केलेला प्रवास प्रेरणादायी आहे. देशातील अनेक युवा खेळाडूंना यामुळे प्रोत्साहन मिळेल, असेही मोदींनी म्हटले आहे.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत टेबल टेनिस क्रीडा प्रकारात भारताला पदक मिळवून देणारी ती भारताची पहिली खेळाडू ठरलीये. अंतिम सामन्यात चीनच्या यिंग झोउ हिच्याविरुद्ध झालेल्या लढतीत तिने तगडी फाइट दिली. पण या सामन्यातील पराभवामुळे तिला रौप्य पदकावरच समाधान मानावे लागले.

भाविना पटेल हिने टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेतील रौप्य कामगिरीनंतर देशवासियांचे आभार मानले आहेत. माझ्या यशात प्रशिक्षक, कुटुंबिय आणि मित्रांसह देशवासियांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे ऐतिहासिक कामगिरी शक्य झाली. त्यामुळे माझे पदक मी देशासाठी समर्पित करते, अशी भावनिक प्रतिक्रिया भाविनाने दिले आहेत. अंतिम सामन्यापूर्वी नर्वस होते. त्यामुळे ऐनवेळी रणनिती आखण्यात चूक झाली. पुढच्यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करेन. रौप्य पदकाच्या कमाई समाधानकारक आहे, असेही तिने म्हटले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thailand Pub Fire : पबमध्ये मध्यरात्री भीषण अग्नितांडव, २७ जणांचा होरपळून मृत्यू, ६३ गंभीर जखमी; दुर्घटनेचा थरारक व्हिडिओ समोर

Constitutional Amendment India: मंत्रिपदावरून हटविण्याऐवजी निलंबन;प्रस्तावित १३०व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत संसदीय समितीची शिफारस

शेतकऱ्यांना ३१ जुलैपूर्वी कर्जमाफी! ३ टप्प्यात कर्जमाफी, १५ लाख शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा होणार; पहिल्यांदा कर्जमाफी कोणाला? निकष काय बदलले, वाचा सविस्तर...

अर्थवेध : भारतीय गुंतवणूकदारांचा विजय; ‘एफआयआय’ युगाचा अस्त?

ढिंग टांग : वैशाखनंदन संवाद..!

SCROLL FOR NEXT