Mariyappan-Thangavelu-Sharad-Kumar 
क्रीडा

Tokyo Paralympics: भारताची 'हनुमानउडी'; मिळवलं रौप्य, कांस्यपदक

विराज भागवत

उंच उडीत मरियप्पनची रौप्य तर शरद कुमारची कांस्यकमाई

Tokyo Paralympics: टोक्यो येथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली. उंची उडीच्या T42 गटात भारताने चक्क दोन मेडल मिळवली. मरियप्पन थंगवेलू याने रौप्य पदकाला गवसणी घातली, तर शरद कुमारने कांस्यपदकाची कमाई केली. मरियप्पनने १.८६ मीटर एवढी उंच उडी मारली. त्याचा प्रयत्न केवळ ०.०२ मीटरने तोकडा पडला. अमेरिकेच्या सॅम ग्रीव्ह याने १.८८ मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक पटकावले. तर कांस्य पदक विजेता शरद कुमार याने १.८३ मीटर उंच उडी मारली. या दोन पदकांसह भारतीय चमूच्या पदकांची संख्या १० झाली. आता भारताकडे टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये २ सुवर्ण, ५ रौप्य आणि ३ कांस्य पदके आहेत.

T42 या उंच उडी प्रकारात पायात असलेल्या समस्येवर मात केलेल्या स्पर्धकांना सहभागी होता येते. मरियप्पन आणि शरद कुमार यांनी या क्रीडा प्रकारात सहभाग घेत भारताला एकाच सामन्यात दोन पदके मिळवून दिली. या सामन्यात आणखी एका भारतीयानेही सहभाग घेतला होता. २०१६च्या रियो पॅरालिम्पिक स्पर्धेत कांस्यपदकाची कमाई करणारा वरूण सिंह भाटी हा देखील स्पर्धेत होता, पण १.७७ मीटरचा मार्क पार न करता आल्याने एकूण ९ स्पर्धकांपैकी त्याचा सातवा क्रमांक लागला. पाहा भारताला दोन पदके मिळवून देणाऱ्या दोन उंच उड्या...

मरियप्पनला रौप्यपदक (Video)-

शरद कुमारला कांस्यपदक (Video)-

या दोन पदक विजेत्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अभिनंदन केले.

टोकियो पॅरालिंपिक स्पर्धेत भारताचा स्वप्नवत प्रवास सुरू आहे. भारताने प्रथमच दुहेरी मेडल संख्या गाठली आहे. कालपर्यंत भारताच्या नावावर सात पदके होती. भाविना पटेलने टेबल टेनिसपासून केली. त्यानंतर निशाद कुमारने उंच उडीत पदक मिळवलं. अवनी लेखारा हिने तर सुवर्ण इतिहास रचला. थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाने तर भालाफेकमध्ये देवेंद्र झांझरिया आणि सुंदर कुमार गुर्जरने रौप्यपदक पटकावले. विनोद कुमारनेही थाळीफेकमध्ये पदक मिळवलं होतं, पण काही तांत्रिक कारणास्तव त्याचं पदक काढून घेण्यात आले. त्यानंतर आज सिंगराज अदानाने शूटिंगमध्ये कांस्यपदक मिळवले. त्यापाठोपाठ या दोघांनी भारताला दोन पदके मिळवून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT