क्रीडा

Paralympics - भारताने फोडली पदकांची 'हंडी'; सुवर्णपदकासह 2 रौप्य, एक कांस्य

सकाळ डिजिटल टीम

सोमवारी भारताच्या खात्यात एकूण चार पदके आली असून रविवारी एका दिवसात तीन पदकं पटकावली आहेत.

टोकियो - पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympic) भारताच्या खात्यात आज अनेक पदकं मिळण्याची शक्यता आहे. दिवसाची सुरुवातच सुवर्णपदकाने झाली. अवनि लेखाराने 10 मीटर रायफलमध्ये सुवर्णवेध घेतला आहे. तिच्यानंतर भालाफेकीत दोन तर थाळीफेकमध्ये एक पदक भारताला मिळालं. देवेंद्र झाझारियाने रौप्य तर सुंदर सिंगने कांस्यपदक पटकावलं आहे.

याशिवाय थाळीफेकमध्ये योगेश कथुनियाने रौप्य पदक मिळवलं आहे. भालाफेकपटू देवेंद्र झाझारियाने आतापर्यंत भालाफेकीत पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं पटकावली आहेत.

भारताची नेमबाज अवनि लेखाराने 10 मीटर एअर पिस्टलमध्ये 249.6 पॉइंटसह सुवर्णपदकावर नाव कोरलं.

टोकियो पॅरालिम्पिकमधील हे भारताचं पहिलंच सुवर्णपदक ठरलं आहे. सोमवारी भारताच्या खात्यात एकूण चार पदके आली असून रविवारी एका दिवसात तीन पदकं पटकावली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT