क्रीडा

भालाफेकमध्ये भारत पुन्हा अव्वल! सुमित अंतिलला सुवर्ण

सकाळ डिजिटल टीम

Tokyo Paralympics: टोक्यो पॅरालिम्पिक्समध्ये पुरुष भालाफेक (javelin Throw) स्पर्धेत भारताच्या सुमित अंतिलने (Sumit Antil) सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. त्याने ६८.५५ मीटर (meters) इतका लांब भाला फेकला आणि विश्वविक्रम (World Record) प्रस्थापित केला. F64 गटात सुमितने एकदा-दोनदा नव्हे तर चक्क तीन वेळा जुना विश्वविक्रम मोडीत काढला. पहिल्या प्रयत्नात त्याने ६६.९५ मीटर लांब भालाफेक करत विश्वविक्रम मोडीत काढला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात त्याने स्वत:चाच आधी विक्रम मोडला. तर पाचव्या प्रयत्नात त्याने ६८.५५ मीटर लांब भालाफेक करत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. सुमितचा भारतीय सहकारी संदीप चौधरी याने ६२.२० मीटर भालाफेक करत स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला.

ऑस्ट्रेलियाचा मीचॅल बरियन याने ६६.२९ मीटर लांब भालाफेक करून रौप्यपदक कमावले. तर, श्रीलंकेचा दुलान कोडीथुवक्कू याने कांस्यपदक पटकावले. अंतिलने F64 गटात पहिल्याच प्रयत्नात नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT