Singhraj Adhana  Twitter
क्रीडा

व्वा! भारताच्या नेमबाजाचा पदकी निशाणा, खात्यात आणखी एक मेडल

यापूर्वी महिला गटातील 10 मीटर रायफल इव्हेंटमध्ये गोल्डन कामगिरीची नोंद केली होती.

सुशांत जाधव

Tokyo Paralympics Singhraj Adhana Wins Bronze : भारताचा नेमबाजपटू सिंहराज अधाना याने पुरुष 10 मीटर एअर रायफल पिस्टल प्रकारात आणखी एका पदकाची कमाई केलीये. मंगळवारी झालेल्या इवेंटमध्ये त्याने कांस्य पदकावर नाव कोरले. 216.8 गुणांसह त्याने हे पदक आपल्या नावावर केले. यापूर्वी महिला गटातील 10 मीटर रायफल इव्हेंटमध्ये गोल्डन कामगिरीची नोंद केली होती. या पदकासह भारताच्या खात्यात यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत 8 पदक जमा झाली आहेत. यात 2 सुवर्ण 4 रौप्य आणि 2 कांस्य पदकाचा समावेश आहे.

पात्रता फेरीत अव्वस्थानी असलेला भारताचा मनीष नरवाल याला फायनलमध्ये लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयश आले. तो सुरुवातीलाच पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला. पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात चीनच्या चाओ यांगने 237.9 गुण मिळवत पॅरालिंपिक स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवत सुवर्ण पदकावर नाव कोरले. चीनच्याच जिंग हुआंग याने 237.5 गुणांसह रौप्य पदकाची कमाई केली. सिंहराज अदाना याने 10 शॉट्समध्ये 99.6 गुण प्राप्त करत पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सिंहराज अदाना याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. भारताच्या आणखी एका नेमबाजाने आपल्यातील क्षमता दाखवून देत देशासाठी ब्राँझ पदकाची कमाई केली. कठोर मेहनतीनंतर मिळालेल्या अवस्मरणीय यशाबद्दल सिंहराज याचे खूप खूप अभिनंदन! अशा शब्दांत मोदींनी सिंहराजच्या कामगिरीला दाद दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : एकादशीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते; पहाटे 2.30 वाजता होणार महापूजा

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

SCROLL FOR NEXT