treesa jolly gayatri gopichand australian open second round score result highlights report sakal
क्रीडा

Australian Open : ट्रीसा-गायत्री दुसऱ्या फेरीत; कॅनडाच्या जोडीवर मात

भारतीय जोडीने कॅथरीन चोई - जॉसफिन वुई या जोडीवर २१-१६, २१-१७ असा विजय साकारला.

सकाळ वृत्तसेवा

सिडनी : भारतीय बॅडमिंटनपटूंना मंगळवारपासून सुरू झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन सुपर ५०० या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये संमिश्र यशाला सामोरे जावे लागले. एकीकडे ट्रीसा जॉली - गायत्री गोपीचंद या जोडीने विजय संपादन केला, तर दुसरीकडे अश्‍विनी पोन्नाप्पा - तनीशा क्रॅस्टो व एन. सिक्की रेड्डी - अराती सारा सुनील या जोडींना पराभवाचा सामना करावा लागला.

ट्रीसा - गायत्री या जोडीने महिला दुहेरीतील पहिल्या फेरीच्या लढतीत कॅनडाच्या जोडीला पराभूत केले. भारतीय जोडीने कॅथरीन चोई - जॉसफिन वुई या जोडीवर २१-१६, २१-१७ असा विजय साकारला. ट्रीसा - गायत्री या जोडीसमोर आता मायू मातसुमोतो - वाकाना नागाहारा या जपानच्या जोडीचे कडवे आव्हान असणार आहे.

फॅब्रियाना कुसुमा - अमालिया प्रतिवी या इंडोनेशियाच्या जोडीने महिला दुहेरीच्या लढतीत अश्‍विनी - तनीशा या भारतीय जोडीवर २१-११, १४-२१, २१-१७ असा विजय साकारला. भारतीय जोडीने इंडोनेशियाच्या जोडीला कडवे आव्हान दिले.

मात्र त्यांना विजयापासून दूरच रहावे लागले. सु यिन - लीन चेन या तैवानच्या जोडीने सिक्की रेड्डी - अराती सुनील या जोडीचे आव्हान संपुष्टात आणले. तैवानच्या जोडीने २१-१४, २१-१७ असा विजय संपादन केला.

दरम्यान, डेन्मार्क येथे जागतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. ही स्पर्धा कोपेनहॅगन येथे २१ ते २७ ऑगस्ट रोजी पार पडेल. त्याआधी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा होत आहे. बहुतांशी खेळाडू या स्पर्धेकडे सराव स्पर्धा म्हणून बघत आहेत. पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन व एच.एस.प्रणॉय या भारतीय खेळाडूंचा ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय सिनेसृष्टीला आणखी एक धक्का ! अभिनेते सतीश शाह यांचं निधन

paschim maharashtra: मिरजेत रात्रीत शेळ्या-मेंढ्या चोरीला गेल्या; मेंढपाळांनी पोलिसांना इशारा दिला, ‘चोरटे पकडले नाही तर...’

Wi-Fi Tips: रात्री वाय-फाय बंद का करावे? अर्ध्याहून अधिक लोकांना माहिती नाहीत फायदे

Katraj News: कात्रजमध्ये दुर्गंधीचा त्रास! नानासाहेब पेशवे तलाव परिसरात कचऱ्याचा साठा

Gopal Badne: साताऱ्यातून पळाला अन् 'इथे' जाऊन लपला... पीएसआय गोपाल बदने कुठे आहे? शेवटचं लोकेशन आलं समोर

SCROLL FOR NEXT