trent boult
trent boult 
क्रीडा

Trent Boult : ट्रेंट बोल्ड घेणार निवृत्ती? न्यूझीलंड बोर्डाच्या करारातून बाहेर

Kiran Mahanavar

Trent Boult May Retirement New Zealand Cricket : क्रिकेट चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. न्यूझीलंडचा स्टार वेगवान गोलंदाज एकदिवसीय क्रिकेटमध्ये नंबर-1 स्थानावर असलेला ट्रेंट बोल्ट कदाचित आता निवृत्ती घेण्याचा विचार करत आहे. ट्रेंट बोल्टने न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबतचा केंद्रीय करार संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंड बोर्ड आणि दोघांनीही या निर्णयाला सहमती दर्शवली आहे. पण चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की बोल्टने निवृत्ती घेण्यास नकार दिला आहे. कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी आणि जगभरातील क्रिकेट लीग खेळण्यासाठी त्याने हे सर्व केले आहे.

ट्रेंट बोल्ट म्हणाला, 'खरं तर हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण होता. मला पाठिंबा दिल्याबद्दल न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे आभार आहे. देशासाठी खेळणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. 12 वर्षे देशासाठी खेळल्याचा अभिमान आहे. माझा हा निर्णय पूर्णपणे पत्नी आणि तीन मुलांसाठी होता. कुटुंब माझ्यासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहे. क्रिकेटनंतर त्याला प्राधान्य दिल्याने मला बरे वाटते. ट्रेंट बोल्टच्या या निर्णयानंतर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही चाहत्यांना चुकीच्या पद्धतीने घेऊ नका असे सांगितले आहे. हा निर्णय त्याच्या कारकिर्दीचा शेवट नाही. तसेच, न्यूझीलंड बोर्डाने सांगितले की, जे खेळाडू करारात असतील त्यांनाच निवडीत प्राधान्य दिले जाईल. अशा परिस्थितीत बोल्टने अप्रत्यक्षपणे काही काळ विश्रांती घेतली आहे किंवा त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला आहे, असा अंदाज बांधला जाऊ शकतो.

ट्रेंट बोल्टने न्यूझीलंड कडून खेळताना आतापर्यंत 78 कसोटीत 317 विकेट्स आणि 93 वनडेत 169 बळी घेतले आहेत. तसेच, बोल्टने 44 टी-20 सामन्यात 62 विकेट्स घेतल्या आहेत. बोल्ट आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाइट रायडर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Samir Choughule: "तुझ्या विना माझे सतत..."; बायकोच्या वाढदिवसानिमत्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Marathi News Live Update: "केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे", जयराम रमेश यांची टीका

SCROLL FOR NEXT