Two Indian Cricket Team Member Amir Elahi And Gul Mohammad Refuse To Salute Indian National Flag In First Foreign Tour After Independence esakal
क्रीडा

गांधीजींची हत्या, तिरंग्याचा अपमान अन् दोन क्रिकेटर गेले पाकिस्तानात; काय आहे प्रकरण?

अनिरुद्ध संकपाळ

75th Independence Day 2022 : भारत आज आपला 75 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करत आहे. भारताच्या स्वांतत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. देशाने या 75 वर्षात अनेक क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. भारताने उद्यो,ग, तंत्रज्ञान कृषी, स्पेस अशा क्षेत्रात उत्तूंग भारारी घेतली आङे. याचबरोबर क्रीडा क्षेत्रातही भारताने आपले नाणे खणखणीत वाजवून दाखवले आहे. भारत क्रिकेट, बॅडमिंटन, कुस्ती, नेमबाजी, टेबलटेनिस अशा अनेक खेळात आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहे. दरम्यान, भारताच्या स्वातंत्र्यापूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या भारतीय क्रिकेट संघासोबत 1947 - 48 मध्ये एक किस्सा घडला होता. (Two Indian Cricket Team Member Amir Elahi And Gul Mohammad Refuse To Salute Indian National Flag In First Foreign Tour After Independence)

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने 1947 - 48 मध्ये आपला पहिला विदेशी दौरा केला. भारत त्या काळातील बलाढ्य अशा ऑस्ट्रेलिया संघासोबत दोन हात करण्यासाठी त्यांच्या मायदेशात दाखल झाला होता. याच दरम्यान, मेलबर्न कसोटीपूर्वी भारतात राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची हत्या करण्यात आली. ऑस्ट्रेलियात असलेल्या भारतीय संघाने बापूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी भारताच्या तिरंग्याला सलाम करण्याचा निर्णय घेतला. मात्र या भारतीय संघातील दोन खेळाडूंनी भारताच्या तिरंग्याला सलाम करण्यास नकार दिला.

पाकिस्तानचा पुळका असलेल्या अमीर इलाही आणि गुल मोहम्मद यांचे म्हणणे होते की ते भारतात परतल्यानंतर नव्याने तयार झालेल्या पाकिस्तान कडून खेळणार आहेत. त्यामुळे ते तिरंग्याला सलामा करू शकत नाही. ही गोष्ट ऐकताच कर्णधार लाला अमरनाथ यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. त्यांनी या दोघांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले की तुम्हाला पाकिस्तान कडून खेळायचे आहे तर ते मायदेशात परतल्यानंतर खेळा. मात्र आता तुम्ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताय. याच झेंड्याखाली खेळताय तर त्याला सलाम करावा लागेल.

मात्र हैदराबादकडून खेळणाऱ्या गुल मोहम्मद आणि बडोदाकडून खेळणाऱ्या अमीर इलाही यांनी असं करण्यास नकार दिला. यावेळी भारतीय संघासहित ऑस्ट्रेलियानेही आपल्या दंडाला काळ्या फिती बांधत गांधींच्या हत्येचा निषेध केला होता. हैदराबादचे गुल मोहम्मद हे तिसऱ्या क्रमांकाचे फलंदाज होते. तर अमीर इलाही हे वेगवान गोलंदाज होते. या दोघांचे म्हणणे होते की, देश दोन तुकड्यात विभागला गेला आहे. आम्ही परत गेल्यानंतर पाकिस्तानकडून खेळणार आहे. त्यामुळे त्यांनी तिरंग्याला सलाम करण्यास नकार दिला. स्वतंत्र भारताच्या पहिल्याच विदेशी दौऱ्याला या दोघांनी गालबोट लावले. पुढच्या काळात अमीर इलाही आणि गुल मोहम्मद हे दोघेही पाकिस्तानकडून खेळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tejashwi Yadav FIR : मोठी बातमी! तेजस्वी यादव यांच्याविरोधात गडचिरोलीत गुन्हा दाखल

TikTok India News: भारतात पुन्हा 'टिकटॉक' सुरू होणार? ; वेबसाइट सुरू झाल्याचे समोर आल्याने चर्चांना उधाण!

Ajit Pawar: 'चाकरमानी’ नव्हे; ‘कोकणवासीय’ म्हणायचे! अजित पवारांची जागवला स्वाभिमान; शासन लवकरच परिपत्रक काढणार

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीचं पुनर्गठन; राधाकृष्ण विखेंकडे अध्यक्षपद

Georai News : पाझर तलावात उतरल्याने बुडून शेतमजूराचा मृत्यू; दिवसभर शोध घेऊनही मृतदेह मिळाला नाही

SCROLL FOR NEXT