West Indian Women Players  Twitter
क्रीडा

VIDEO : प्रकृती स्थिर; पण दोघींना त्रास कशामुळे हे गुलदस्त्यातच

एकाच वेळी दोघींसोबत ही घटना कशी घडली? या प्रश्नाची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच

सुशांत जाधव

खेळाच्या मैदानात मागील काही दिवसांत धक्कादायक घटनांनी अनुभूती येत आहे. युरो कप स्पर्धेत डेन्मार्कचा क्रिस्टियन एरिक्सन सामना सुरु असताना मैदानात पडल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली. त्यानंतर आता महिला क्रिकेटच्या मैदानात असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे. वेस्ट इंडिज महिला क्रिकेट संघ आणि पाकिस्तान महिला क्रिकेट संघ यांच्यात रंगलेल्या सामन्या दरम्यान शुक्रवारी दोन कॅरेबियन खेळाडू चक्कर येऊन मैदानात कोसळल्या. या घटनेनंतर फिल्डवर एकच गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. त्या दोघींना नेमक कशाचा त्रास होता. एकाच वेळी दोघींसोबत ही घटना कशी घडली? या प्रश्नाची उत्तरे अद्यापही गुलदस्त्यातच आहेत. (Two West Indian Women Players Collapse During Match Against Pakistan Video)

वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रवक्ताने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही खेळाडूंची प्रकृती स्थिर आहे. चिनेल हेन्री आणि डेडियन नेशन या दोघींची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे. हा प्रकार नेमका कशामुळे घडला यासंदर्भात बोर्डाने कोणतीही माहिती दिलेली नाही.

पाकिस्तान महिला संघाची कर्णधार जावेरिया खान हिने कॅरेबियन महिला संघाच्या लढवय्या वृत्तीचे कौतुक केले आहे. दोन खेळाडूंसोबत मैदानात घडलेल्या या प्रकारानंतरही वेस्ट इंडिज महिला संघाने सामना पूर्ण खेळला. एवढेच नाही तर त्यांनी पाकिस्तानी संघाला पराभूतही केले. पाकिस्तान संघातील सर्व खेळाडू कॅरेबियन खेळाडूंसाठी दुआ करत आहोत, असा उल्लेखही पाकिस्तानी कर्णधाराने केलाय.

शुक्रवारी रंगलेल्या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने दुसऱ्या टी-20 सामन्यात डकवर्थ लुईस नियमावलीनुसार 7 धावांनी विजय नोंदवला होता. या विजयासह त्यांनी तीन सामन्यांची टी-20 मालिका खिशात घातली. रविवारी दोन्ही संघात टी-20 मालिकेतील अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT