U 19 WC esakal
क्रीडा

U 19 WC: इंग्रजांना रडवणारी कोण आहे तीतास साधु? टीम इंडियाला बनवले वर्ल्ड चॅम्पियन

महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने रचला इतिहास

सकाळ डिजिटल टीम

महिला अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या अंतिम सामन्यात भारताच्या मुलींनी इतिहास रचला आहे. टीम इंडियाने शानदार कामगिरी करत सामना जिंकला. या विजयात मोलाचा वाटा गोलंदाज तीतास साधु हिचा आहे.(U 19 WC who Titas Sadhu IND vs ENG Cricket U19 World Cup final )

तीता साधुच्या घातक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही. त्यांना केवळ ६८ धावांवरच समाधान मानावे लागले. बंगालमध्ये जन्मलेल्या तीतास साधूला तिच्या शानदार गोलंदाजीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

तितस साधूने 4 षटकांत केवळ 6 धावा देत 2 महत्त्वाचे बळी टिपले. तीतसोबतच फिरकीपटू अर्चना देवीनेही आपल्या फिरकीने जादू निर्माण केली. दोन्ही गोलंदाजांनी सुरुवातीच्या 7 षटकांत इंग्लंडच्या 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला होता.

नव्या चेंडूने आश्चर्यकारक कामगिरी करणाऱ्या तीतासने स्पर्धेतील 6 सामन्यात एकूण 6 बळी घेतले. भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडचा 7 विकेट्सने पराभव करत विजेतेपद पटकावले.त्याने

तितास साधू ही पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील चुचुडा येथील रहिवासी आहे. तितसने धावपटू म्हणून खेळात आपला प्रवास सुरू केला, पोहणे आणि नंतर टेबल टेनिसकडे आपला मोर्चा वळवला.

एकेदिवशी ती कोलकत्यामधील तिच्या वडिलोपार्जित क्रिकेट क्लबकडून राजेंद्र स्मृती संघासाठी खेळली. त्यानंतर ती क्रिकेटच्या प्रेमात पडली. तितासने तिच्या माध्यमिक परीक्षेत ९३ टक्के गुण मिळवले.

जेव्हा तिच्या क्लबच्या बाजूने नेट बॉलर कमी पडला तेव्हा त्यांनी टिटासला कॉल केला. तेव्हापासून तिने कधीही मागे वळून पाहिले नाही. खेळासाठी तिनं शाळेकडे दुर्लक्ष केले.

तिचे प्रशिक्षक रणदीप साधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला आशा आहे की टायटस अंतिम फेरीतही चांगली कामगिरी करेल. बंगालमधून येणारी देशाची महान गोलंदाज झुलन गोस्वामी ही तितासची प्रेरणा आहे. . चुंचुडा मैदानावर सराव करून क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न तितासने पाहिले होते.

तितासने आपल्या वडिलांशिवाय प्रियंकर मुखोपाध्याय आणि देवदुलाल रॉय चौधरी यांच्याकडूनही क्रिकेटचे धडे घेतले. भारतीय संघात तितास ही एकमेव बंगाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

City Disfigurement Award : ‘शहर विद्रूपीकरण पुरस्कार’ भाजप नगरसेवकांना; स्थायी समिती अध्यक्ष भिमालेंना प्रथम, सुतारांना द्वितीय, तर पांडेंना तृतीय

Pune Shivajinagar Court Firing Health Update : "पुढचे ७२ तास अत्यंत महत्त्वाचे!" शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ला झालेल्या मंदार किवळेची प्रकृती चिंताजनक; ससूनच्या अधिष्ठात्यांकडून महत्त्वाची माहिती

Online Gaming: PUBG मधून जुळली मैत्री; मग प्रेमाचे नाटक! गेमिंग पार्टनरनेच तरुणीचा गळा आवळला

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT