U19 Asia Cup 2023  eSakal
क्रीडा

U19 Asia Cup 2023 : खडूस मुंबईकर कोच बनला अन् बांगलादेशने रचला इतिहास! पहिल्यांदाच जिंकला U-19 आशिया कप

नुकताच दुबईत अंडर-19 आशिया कप खेळला गेला

Kiran Mahanavar

U19 Asia Cup 2023 : नुकताच दुबईत अंडर-19 आशिया कप खेळला गेला. या स्पर्धेतील भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. ज्याने हे विजेतेपद आठ वेळा जिंकले आहे, परंतु यावेळी भारताच्या युवा खेळाडूंचे ही स्वप्न अधुरेच राहीले. कारण बांगलादेशने ही स्पर्धा जिंकली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रविवारी झालेल्या विजेतेपदाच्या सामन्यात बांगलादेशच्या अंडर-19 संघाने यूएईचा 195 धावांनी पराभव केला. या विजयासह बांगलादेशने इतिहास रचला.

या संघाने प्रथमच अंडर-19 आशिया कप जिंकला असून या विजयात एका मुंबईकरचा मोठा वाटा आहे. बांगलादेशने या सामन्यात आठ गडी गमावून 282 धावा केल्या आणि त्यानंतर यूएईला 24.5 षटकांत केवळ 87 धावांत गुंडाळले.

बांगलादेशच्या या विजयात भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरचा मोठा वाटा आहे. जाफर हा या संघाचा कोच होता आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघाने चमकदार खेळ करत विजेतेपद पटकावले. या संघाने उपांत्य फेरीत भारताचा पराभव केला होता.

बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिल्यानंतर जाफर खूप आनंदी झाला आहे. याबद्दल त्याने आपल्या इंस्टाग्रामवर आनंद व्यक्त केला आहे. जाफरने लिहिले की, त्यांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यात टीम यशस्वी ठरली. बांगलादेशकडून या सामन्यात अश्किउर रहमान शिबलीने शतक झळकावले. त्याने 139 चेंडूत 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 129 धावांची खेळी खेळली.

त्यांच्याशिवाय चौधरी मोहम्मद रिझवानने 60 तर अरिफुल इस्लामने 50 धावांची खेळी खेळली. इतर कोणत्याही फलंदाजाला फारसे योगदान देता आले नाही. या तिघांव्यतिरिक्त फक्त कर्णधार महफुजुर रहमानला दुहेरी आकडा गाठता आला.

फलंदाजीनंतर बांगलादेशने गोलंदाजीत कहर केला. या संघाच्या सर्व गोलंदाजांनी योगदान देत यूएईला स्वस्तात बाद केले. मारूफ मृधा आणि रोहनत बोरसन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. इक्बाल हुसेन आणि शेख परवेझ जिबोन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

यूएईचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. संघाकडून ध्रुव पारशरने सर्वाधिक 25 धावा केल्या. अक्षत रायने 11 धावांचे योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arif Khan Chishti : मुस्लिम तरुणाचा मोठा निर्णय! संत प्रेमानंद महाराजांना किडनी दान करण्याची तयारी, वाचा कोण आहे आरिफ खान?

Whatsapp Mirror : व्हॉट्सअ‍ॅपवर एक परमिशन अन् बँक अकाऊंट रिकामं, 'हे' फेमस फीचर ठरतंय मोबाईल हॅकिंगचं कारण

Latest Marathi News Updates : शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

समृद्धीवर सराफ व्यापाऱ्याला लुटलं, 4,78,79,000 रुपये किंमतीचं सोनं अन् रोकड घेऊन दरोडेखोर फरार

Ganesh Chaturthi 2025: गणपतीची तयारी, बाप्पांच्या पूजेसाठी लागणारे साहित्य कसे गोळा कराल? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT