U19 Asia Cup  
क्रीडा

U19 Asia Cup : पाक अव्वल; पण युवा टीम इंडियानंही गाठली सेमीफायनल

सुशांत जाधव

अंडर 19 आशियाई स्पर्धेत युवा भारतीय संघाने (India U-19) अफगाणिस्तानला U19 (AFG U 19) 4 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये प्रवेश केलाय. गुरूवारी भारतीय संघ फायनल खेळण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात हरनूर सिंह (Harnoor Singh) ने आपल्यातील फलंदाजीतील झलक दाखवून दिली. त्याने 74 चेंडूत 65 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने 9 खणखणीत चौकार ठोकले. हरनूरशिवाय राजनगड बावने 43 धावा केल्या तर कौशल तांबेनं 29 चेंडूत 35 धावांची खेळी केली. कौशलने आपल्या खेळीत 4 चौकार खेचले.

अफगाणिस्तान संघाने पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 50 षटकात 4 बाद 259 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानकडून एजाज अहमद अहमदजईक याने 68 चेंडूत 86 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत 7 उत्तुंग षटकार खेचले. त्याने भारतीय संघातील गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. त्याच्याशिवाय सुलेमान सफीने 86 चेंडूत 73 धावांची खेळी केली.

अफगाणिस्तान संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दमदार सुरुवात करुन दिली हरनूर सिंह आणि रघुवंशी या सलामी जोडीने पहिल्या विकेटसाठी 104 धावा केल्या. रघुवंशी 35 धावा करुन माघारी फिरल्यानंतर शैक राशीद (6), कर्णधार यश धूल (26) धावा करुन माघारी फिरले. हरनूर सिंहने 65 धावांची खेळी केली.

हरनूर सिंह (Harnoor Singh) ची कामगिरी

हरनूर सिंह (Harnoor Singh) याने या स्पर्धेत दमदार कामगिरी करुन प्रभावित केले आहे. हरनूरने 120, 46, आणि 65 धावा केल्या आहेत. अंडर 19 आशियाई कप स्पर्धेत भारतीय युवा खेळाडूनं 3 सामन्यात 231 धावा करुन आगामी काळात टीम इंडियात येण्याचा क्षमता असल्याचे दाखवून दिले आहे.

पाकिस्तानने केला होता पराभव

अ गटात भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर राहिला. भारतीय संघाने या स्पर्धेत 3 सामने खेळले आहेत. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात त्यांना पराभव स्विकारावा लागला होता. भारतीय संघाला पाकने 2 विकेट्सने पराभूत केले होते. दुसरीकडे पाकिस्ताने तीन पैकी तीन सामने जिंकत गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवत सेमी फायनल गाठली आहे. फायनलमध्ये पुन्हा भारत-पाक सामना पाहायला मिळू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT