U19 T20 World Cup India vs England Shafali Verma and MS Dhoni 2007 t20 World Cup esakal
क्रीडा

U19 T20 World Cup: शेफाली वर्मा ठेवणार धोनीच्या पावलावर पाऊल; १६ वर्षांनी पुन्हा...

महेंद्रसिंग धोनीने १६ वर्षांपूर्वी जे केले होते, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी शेफाली वर्माला

सकाळ डिजिटल टीम

महेंद्रसिंग धोनीने १६ वर्षांपूर्वी जे केले होते, त्याच इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी शेफाली वर्माला आहे. आज १९ वर्षांखालील महिलांच्या विश्‍वकरंडकाची अंतिम लढत आज रंगणार आहे. शेफाली वर्माच्या नेतृत्वात भारतीय महिला क्रिकेट संघाला आज इतिहास रचण्याची संधी आहे. (U19 T20 World Cup India vs England Shafali Verma and MS Dhoni 2007 t20 World Cup)

भारतासमोर आज भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. इतिहास रचण्यासाठी दोन्ही संघांचे लक्ष असेल. कारण पहिल्यांदाच अंडर-19 महिला टी २० विश्वचषक खेळला जात आहे, जो संघ अंतिम फेरीत विजयी होईल, त्याचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. अशा स्थितीत शेफालीच्या नजरा धोनीच्या २००७ च्या करिष्माची पुनरावृत्ती करण्यावर असतील.

१६ वर्षांपूर्वी २००७मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली, भारत प्रथमच टी २० विश्वविजेता बनला आणि १९८३ नंतर भारतीय संघाने प्रथमच विश्वचषक जिंकला. आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा महिला अंडर-१९ क्रिकेट संघही त्याच उंबरठ्यावर उभा आहे.

२००७ मध्ये पहिल्यांदा टी२० वर्ल्ड कप खेळवण्यात आला

२००७ मध्ये पुरुषांचा टी-२० विश्वचषक पहिल्यांदा खेळला गेला. टी-२० फॉर्मेटमध्ये विश्वचषक आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ होती. त्याचप्रमाणे सध्याचा महिला अंडर-१९ टी-२० विश्वचषकही प्रथमच खेळवला जात आहे.

याआधी पुरुष क्रिकेटमध्ये फक्त अंडर-१९ विश्वचषक होता आणि तोही एकदिवसीय प्रकारात. महिला अंडर-१९ विश्वचषक पहिल्यांदाच होत आहे आणि तोही टी-२० फॉरमॅटमध्ये. म्हणजेच धोनी आणि शेफालीमध्ये ही एक गोष्ट समान आहे.

तसेच २००७ मध्ये झालेला सामना दक्षिण अफ्रिका येथे खेळवण्यात आला होता. तेव्हा धोनीने टीम इंडियाला चॅम्पियन बनवले होते. आता महिली अंडर १९ टी २० सामन्याचे आयोजनदेखील दक्षिण अफ्रिकामध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे शेफालीकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT