Team India Winning Moment Celebration 
क्रीडा

Ind vs Eng U19 WC: हाच तो क्षण भारताच्या मुलींनी जिंकून घेतलं सारं...! - Video

Kiran Mahanavar

Team India Winning Moment Celebration : भारतीय महिला अंडर-19 संघाने दक्षिण आफ्रिकेत खेळल्या जाणाऱ्या विश्वचषकात विजय मिळवून इतिहास रचला आहे. घातक गोलंदाजीच्या जोरावर फायनलमध्ये टीम इंडियाने इंग्लंडच्या संघाला अवघ्या 68 धावांत गारद केले. यानंतर 14व्या षटकात 3 गडी गमावून ही छोटी धावसंख्या गाठून विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा केला.

नाणेफेक गमावल्यानंतर इंग्लंड संघाला भारताविरुद्ध फलंदाजी करावी लागली. शेफाली वर्माच्या अचूक रणनीतीसमोर गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत इंग्लिश संघाला अवघ्या 68 धावांत गारद केले.

टीम इंडियाने इतिहास रचला

ICC द्वारे आयोजित पहिल्या ICC अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक फायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध एकतर्फी विजय नोंदवला. शेफाली वर्माच्या भारतीय संघाने धडाकेबाज खेळ दाखवत ट्रॉफी जिंकण्याबरोबरच इतिहासाच्या पानात आपले नाव नोंदवले. पहिला विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम आता या संघाच्या नावावर आहे.

2007 मध्ये भारतीय संघाने ICC टी-20 विश्वचषकाची पहिली आवृत्ती जिंकली. संघाचे कर्णधारपद महेंद्रसिंग धोनीच्या हातात होते आणि युवा संघाच्या बळावर त्याने दक्षिण आफ्रिकेतील फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला होता. शफाली वर्माने दक्षिण आफ्रिकेत पहिला ICC अंडर-19 महिला टी-20 विश्वचषक जिंकून माजी कर्णधाराची बरोबरी केली. भारताने येथे अंतिम फेरीत इंग्लंड संघाचा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: आई-वडिलांवरच अत्याचार! एकुलत्या एक मुलाविरोधात ५८ वर्षीय मातेचा लढा; न्यायालयाचे कडक आदेश..

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला संधी नाहीच, स्टार खेळाडूचे कमबॅक; पहिल्या T20I साठी कशी आहे Playing XI?

WhatsApp चं Username फीचर वादाच्या भोवऱ्यात, केंद्र सरकारने थेट Meta ला पाठवली नोटीस, तीन दिवसांत उत्तर देण्याचे निर्देश

Raigad Accident: पालीत मोठा अनर्थ टळला! खड्ड्यांमुळे एसटी बस रस्त्याखाली घसरली; चालकाच्या प्रसंगावधानाने ४२ प्रवाशांचे प्राण वाचले

Satara Heritage: साताऱ्याच्या ऐतिहासिक वैभवाला नवी झळाळी! संगम माहुली विकासासाठी १३२.९५ कोटींना मंजुरी, काय आहे ऐतिहासिक महत्त्व..

SCROLL FOR NEXT