ICC Under 19 World Cup 2022 IND v BAN
ICC Under 19 World Cup 2022 IND v BAN  Sakal
क्रीडा

VIDEO : सुरेख यॉर्करवर चेंडूनं स्टंम्पला किस तर केलं, पण...

सुशांत जाधव

वेस्ट इंडीजमध्ये सुरु असलेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा क्वार्टर फायनल सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरु आहे. भारतीय संघाचा कर्णधार यश धूलनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रवी कुमारनं आपल्या कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशच्या आघाडीला सुरुंग लावला. त्याने ठराविक अंतराने विकेट्स घेत बांगलादेशच्या संघाला अडचणीत आणले आहे. दरम्यान पहिल्याच चेंडूवर खतरनाक सीन पाहायला मिळाला.

भारतीय संघाकडून राजवर्धन हंगरगेकर याने (Rajvardhan Hangargekar) पहिली ओव्हर टाकली. पहिल्याच षटकातील पहिला चेंडू त्याने यॉर्कर फेकला. बांगलादेशचा सलामीवीर महफिजुल इस्लामला (Mahfijul Islam) हा चेंडू काही समजला नाही. चेंडू स्टंम्पवर जाऊन आदळलाही. पण बेल्स न पडल्यामुळे इस्लाम बाद झाला नाही. आयसीसीने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. चेंडूनं बॅटला चकवा देऊन स्टंम्पला किस केलं पण नशीबाने फलंदाजाला एक संधी मिळाली.

पण इस्लाम याचा फायदा उठवू शकला नाही. दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर रवी कुमारने त्याला बोल्ड केले. महफिजुल इस्लामला (Mahfijul Islam) चार चेंडूचा सामना करुन अवघ्या 2 धावांवर तंबूत परतावे लागले. धावफलकावर अवघ्या 3 धावा असताना बांगलादेशनं आपली पहिली विकेट गमावली. त्यापाठोपाठ ठराविक अंतराने रवीनं बांगलादेशच्या संघाला धक्क्यावर धक्के दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : १० जूनला भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेईल- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT