Yash Dhull Record Ranji Trophy debut Sakal
क्रीडा

Ranji Trophy : यश धूलचा विक्रमी धुरळा!

सुशांत जाधव

भारतीय अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघाचा कर्णधार (India Under-19 World Cup-winning captain) यश धूल (Yash Dhull) याने रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) स्पर्धेत विक्रमी कामगिरी नोंदवली आहे. दिल्लीकडून पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या यशनं तमिळनाडू (Tamil Nadu) संघाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दुसऱ्या डावातही त्याने शतकी खेळी केली. देशांतर्गत क्रिकेटमधील प्रतिष्ठित स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी करणारा तो तिसरा क्रिकेटर ठरलाय. याआधी नरीमन जमशेदजी "नरी" कांट्रेक्टर (Nari Contractor; Gujarat) आणि विराट स्वाठे (Virat Swathe, Maharashtra) यांनी पदार्पणाच्या सामन्यात दोन्ही डावात शतकी खेळी साकरण्याचा पराक्रमक करुन दाखवला होता.

वेस्ट इंडीजमध्ये झालेल्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केलेल्या यश धूलनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सलामीच्या लढतीत 100 चेंडूत 82 धावांची खेळी केली होती. त्यानंतर कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याला काही सामन्याला मुकावेही लागले. बांगलादेश विरुद्धच्या क्वार्टर फायनल लढतीत त्याने संघात कमबॅक केले. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने शतकी खेळी केली होती. अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत त्याने 4 सामन्यात 76.33 च्या सरासरीसह 85.44 च्या स्ट्राइक रेटनं 229 धावा कुटल्या होत्या.

गुवाहटीच्या मैदानात रंगलेला दिल्ली आणि तामिळनाडू यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. दिल्लीने पहिल्यांदा बॅटिंग करताना पहिल्या डावात 452 धावा केल्या होत्या. मध्यफळीत फलंदाजीला येणारा यश धूलनं दिल्लीकडून सलामीला खेळायला आला. या डावात यश धूलनं 150 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. दुसऱ्या डावात दिल्लीनं बिन बाद 228 धावा केल्या. यावेळी धूल 202 चेंडूचा सामना करुन 113 धावांवर नाबाद राहिला. तामिळनाडूनं पहिल्या डावात 494 धावा केल्या होत्या. यात इंद्रजितच्या 117 आणि शाहरुख खानने केलेल्या 194 धावांचा सामावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking: यूजर-फ्रेंडली डिझाइन, कमी स्टेप्स आणि फास्ट बुकिंग! IRCTC संकेतस्थळाचा कायापालट, कधी होणार सुरू?

IND vs ENG 1st ODI: ५-२-३-१... टीम इंडियाचा फॉर्म्युला ठरला; इंग्लंडला सव्याज परतफेड करणारी तगडी प्लेइंग इलेव्हन

Latest Marathi News Live Update : कामरगाव अप्पर तहसील कार्यालयाच्या मागणीसाठी नागरिक एकवटले

Jalna: वारकऱ्यांसाठी दहा वर्षांपासून अखंड जलसेवा; संदीप कंटुले यांच्याकडून माउलीच्या पालखीत टँकरद्वारे मोफत पाणी

कमर्शियल LPG मध्ये मोठा बदल! आता १० किलोचे सिलेंडर मिळणार; व्यावसायिकांची अडचण दूर होणार

SCROLL FOR NEXT