U19 World Cup 2024  esakal
क्रीडा

U19 World Cup 2024 : टॉम स्ट्रेकरचा विकेट्सचा षटकार; ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला स्वस्तात गुंडाळलं

U19 World Cup 2024 AUS vs PAK : ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर पाकिस्तानची अवस्था 5 बाद 79 अशी झाली होती

अनिरुद्ध संकपाळ

U19 World Cup 2024 AUS vs PAK : 19 वर्षाखालील वर्ल्डकपच्या सेमी फायनलमध्ये आज ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड एकमेकांना भिडत आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा डाव 179 धावात गुंडाळला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने पाकिस्तानचे सहा फलंदाज गारद केले. तर पाकिस्तानकडून अराफत मिनहास आणि अझान अवैस यांनी प्रत्येकी 52 धावा केल्या. याव्यतिरिक्त शामयल हुसैन (17 धावा) या एकमेव फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला.

पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमी फायनल सामन्यात नाणेफेक जिंकून गोलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने सुरूवातीला भेदक मारा करत निम्मा संघ 79 धावात गारद केला. पाकिस्तानचा संघ शंभरी देखील पार करणार की नाही याबाबत शंका निर्माण झाली असताना अराफत आणि अझान यांनी डाव सावरला.

या दोघांनी सहाव्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली. अजान अवैसने अर्धशतकी मजल मारली. मात्र टॉम स्ट्रेकरने ही जोडी फोडत अजानला 52 धावांवर बाद केलं. त्यानंतर अराफतने 61 चेंडूत 52 धावा करत पाकिस्तानला 150 धावांचा टप्पा पार करून दिला. मात्र हा सेट झालेला फलंदाज टॉम कॅम्पबेलने बाद करत पाकिस्तानची उरली सुरली आशा देखील धुळीस मिळवली.

अराफत बाद झाला त्यावेळी पाकिस्तानच्या 164 धावा झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पाकिस्तानचा संघ 179 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियाकडून टॉम स्ट्रेकरने 24 धावात 9 विकेट्स घेतल्या. तर बेअर्डमन, वायड्लर, राफ मॅकमिलन आणि टॉम कॅम्पबेलने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT