Team India U19 World Cup 2024 Semifinal marathi news sakal
क्रीडा

U-19 World Cup 2024 : सेमीफायनलमध्ये टीम इंडिया कधी, कोणासोबत अन् कुठे भिडणार?

Kiran Mahanavar

Team India U19 World Cup 2024 Semifinal : सर्वाधिक पाच वेळा विजेते ठरलेल्या भारताच्या युवा क्रिकेट संघाने शुक्रवारी १९ वर्षांखालील विश्वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली. कर्णधार उदय सहारन (१०० धावा) व सचिन धस (११६ धावा) यांची दमदार शतकी खेळी व एस. पांडेसह सर्व गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर भारताच्या युवा संघाने नेपाळच्या युवा संघावर १३२ धावांनी दणदणीत विजय साकारला आणि अंतिम चारमध्ये पाऊल ठेवले. सचिन धस याची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली.

ग्रुप २ मधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्याचबरोबर सुपर सिक्सच्या ग्रुप १ मध्ये टीम इंडिया अव्वल स्थानावर राहणार हे देखील निश्चित आहे. म्हणजेच उपांत्य फेरीत टीम इंडियाचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होईल.

या स्पर्धेचे दोन उपांत्य फेरीचे सामने ६ आणि ८ फेब्रुवारी रोजी खेळले जाणार आहेत. पहिला उपांत्य सामना गट १ मधील अव्वल संघ आणि गट २ मधील द्वितीय क्रमांकाचा संघ यांच्यात होईल. म्हणजेच पहिल्या उपांत्य फेरीत भारत आणि दक्षिण आफ्रिका हे संघ ६ फेब्रुवारीला आमनेसामने येणार आहेत. हा सामना दक्षिण आफ्रिकेतील बेनोनी येथे होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामनाही याच मैदानावर ८ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

भारताच्या संघाकडून नेपाळसमोर २९८ धावांचे आव्हान ठेवण्यात आले. नेपाळला मात्र ९ बाद १६५ धावांपर्यंतच मजल मारता आली. कर्णधार देव खनाल याने सर्वाधिक ३३ धावांची खेळी केली. एस. पांडे याने २९ धावा देत चार फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अर्शिन कुलकर्णीने १८ धावा देत दोन फलंदाज बाद केले. राज लिम्बानी, आराध्य शुक्ला व मुरुगन अभिषेक यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.

त्याआधी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. उदय सहारन व सचिन धस या जोडीने २१५ धावांची भागीदारी रचताना नेपाळच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. उदय याने ९ चौकारांसह १०० धावांची, तर सचिन याने ११ चौकार व ३ षटकारांसह ११६ धावांची खेळी केली. नेपाळकडून गुलशन झा याने ५६ धावा देत तीन फलंदाज बाद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026 : इशा सिंग अन् चीनच्या शाओनेचे समान ३८ गुण, तरीही भारतीय नेमबाजाला मिळाले रौप्यपदक; असं का?

Vinod Kambli Viral Video: विनोद कांबळी वृद्धाश्रमात असल्याचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं? पत्नी अँड्रियाने केला मोठा खुलासा

Maharashtra Drought Relief : मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

Mumbai Malaria: मुंबईत मलेरियाचा वाढता धोका! रुग्णसंख्या ९ हजारांवर; वर्षभरात ४१ टक्क्यांनी वाढ

Latest Marathi News Live Update : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय आज ‘मामा गोल्ड रिंग योजना’ सुरू करणार

SCROLL FOR NEXT