U19 World Cup Semi Final Schedule : sakal
क्रीडा

U19 World Cup : ठरलं तर...! हे संघ 4 उपांत्य फेरीत, भारताचा सामना कोणाशी? जाणून घ्या शेड्यूल

पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 फेब्रुवारीला तर...

Kiran Mahanavar

U19 World Cup Semi Final Schedule : पाकिस्तानने बांगलादेशवर 5 धावांनी विजय मिळवल्यानंतर 19 वर्षाखालील वर्ल्ड कप 2024 च्या उपांत्य फेरीत पोहचणारे 4 संघ निश्चित झाले आहे. सुपर सिक्सच्या अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशवर रोमहर्षक विजय नोंदवला.

पहिला उपांत्य सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात 6 फेब्रुवारीला भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यात 8 फेब्रुवारीला होणार आहे.

विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य आहे. उदय सहारनच्या नेतृत्वाखालील संघाने शेवटच्या सुपर सिक्स सामन्यात नेपाळचा पराभव केला आणि उपांत्य फेरीत स्थान निश्चित केले. भारताने साखळी फेरीत 3 सामने जिंकले आणि सुपर सिक्समध्ये 2 सामने. या संघाने सुपर सिक्समध्ये न्यूझीलंड आणि नेपाळचा पराभव केला.

अंडर-19 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या आणि दुसरा उपांत्य फेरीत कोणते दोन संघ भिडतील?

अंडर-19 वर्ल्ड कप 2024 च्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील उपांत्य सामना कधी आणि कोणत्या वेळी खेळला जाईल?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील उपांत्य फेरीचा सामना मंगळवारी (6 फेब्रुवारी) बेनोई येथे दुपारी 1:30 वाजता होणार आहे.

ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील दुसरा उपांत्य सामना कधी आणि किती वाजता खेळला जाईल?

19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील दुसरा उपांत्य सामना ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात गुरुवारी (8 फेब्रुवारी) बेनोई येथे दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण कोठे पहावे?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वर्ल्ड कप उपांत्य फेरीच्या दोन्ही सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. यासोबत Disney + Hotstar वर पाहू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajendra Singh: ध्येयवेड्यांनीच क्रांती केल्याचा इतिहास: जलपुरुष राजेंद्र सिंह; बंदुकीच्या जागी हातात कुदळ, फावडी

Latest Marathi News Live Update : सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, बाळा नांदगावकर यांची मागणी

कतरिना कैफच्या प्रेग्नेंसीमध्ये घरात चिंतेचं वातावरण, दिराने सांगितलं कुटुबात नक्की चाललंय काय?

Mumbai News: एशियाटिक टाऊन हॉलची दुरवस्था! इतिहास जपायचा की निवडणुका जिंकायच्या? दुहेरी आव्हान उभं

Beed News: गरोदर महिलेच्या जिवाशी खेळ कशासाठी? लेबर रूमसमोरच महिलेची प्रसूती, बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT