uber badminton cup 2024 india youth women in quarter final Sakal
क्रीडा

Uber Cup : भारताचा युवा महिला संघ उपांत्यपूर्व फेरीत; सिंगापूरवर ४-१ने मात

भारताच्या युवा महिला बॅडमिंटन संघाने रविवारी उबेर बॅडमिंटन करंडकात इतिहास रचला.

सकाळ वृत्तसेवा

चेंगडू (चीन) : भारताच्या युवा महिला बॅडमिंटन संघाने रविवारी उबेर बॅडमिंटन करंडकात इतिहास रचला. सलामीच्या लढतीत कॅनडावर ४-१ असा विजय मिळवणाऱ्या भारताच्या महिला संघाने दुसऱ्या लढतीत सिंगापूरवर ४-१ अशी मात करीत अगदी रुबाबात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

भारतीय महिला संघाचा अ गटात समावेश आहे. या गटात भारतासह चीन, कॅनडा व सिंगापूर या देशांचाही समावेश आहे. चीनने सलामीच्या लढतीत सिंगापूरचा व त्यानंतर कॅनडाचा ५-० असा धुव्वा उडवला. या गटामधून चीन व भारत या दोन देशांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. चीन व भारत यांनी प्रत्येकी दोन गुणांची कमाई केली असून चीनचा संघ पहिल्या व भारताचा संघ दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. कॅनडा व सिंगापूरला अद्याप गुणांचे खाते उघडता आले नाही. चीन- भारत यांच्यामध्ये साखळीफेरीचा अखेरचा सामना येत्या मंगळवारी रंगणार आहे.

सिंगापूरच्या येओ जिया मिन हिने भारताच्या अश्‍मिता छलीहा हिच्यावर २१-१५, २१-१८ असा सरळ दोन गेममध्ये विजय साकारला आणि आघाडी मिळवली. त्यानंतर मात्र भारताच्या युवा महिला बॅडमिंटनपटूंनी कात टाकली. प्रिया के.- श्रुती मिश्रा या जोडीने शिओ हेंग- जिन जिया या जोडीवर २१-१५, २१-१६ अशी मात करताना भारतासाठी झोकात पुनरागमन केले व बरोबरी साधली.

इशरानी व अनमोलचे विजय

८३व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या इशरानी बरुहा हिने परतीच्या एकेरी लढतीत इन्सायराह खान हिचे आव्हान २१-१३, २१-१६ असे मोडून काढले. सिमरन सिंघी व रितिका ठाकेर या जोडीने दुहेरीच्या लढतीत यी टिंग लाय- झॅन मिशेल या जोडीवर २१-८, २१-११ असा सहज विजय नोंदवला व भारताला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून दिली. अखेरच्या लढतीत युवा स्टार अनमोल खरब हिने तिसऱ्या एकेरीच्या लढतीत ली शिन मेगन हिच्यावर २१-१५, २१-१३ असा विजय साकारला.

सिंगापूरविरुद्धच्या लढतीत पहिला सामना आम्ही गमावला; पण आम्ही दबावाखाली आलो नाही. कारण या सामन्यात विजय मिळवला तर आमचे उपांत्यपूर्व फेरीतील स्थान पक्के होणार होते. अश्‍मिता छलीहा हिचा कडव्या झुंजीनंतर पराभव झाला. आमच्यावर दबाव होता, मात्र चांगली कामगिरी करण्याचा विश्‍वासही होता.

-श्रुती मिश्रा, महिला बॅडमिंटनपटू, भारत

चौथ्यांदा उपांत्यफेरीची संधी

भारतीय महिला संघाने याआधी उबेर करंडकात तीन वेळा उपांत्य फेरी गाठली आहे. १९५७, २०१४ व २०१६ या वर्षांमध्ये भारतीय महिला संघाने उबेर करंडकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. यंदाही उबेर करंडकाची उपांत्य फेरी गाठण्याची भारतीय महिला संघाकडे संधी आहे. दरम्यान, भारताच्या पुरुष संघाचा थॉमस करंडकातील दुसऱ्या फेरीचा सामना उद्या (ता. २९) होणार असून इंग्लंडशी सामना करावयाचा आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT