Badminton Cup sakal
क्रीडा

Badminton Cup : चीनकडून भारतीय महिला संघाचा पराभव उबेर बॅडमिंटन करंडक ; अ गटात दुसरे स्थान

भारतीय युवा महिला बॅडमिंटन संघाचा उबेर करंडकातील अ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत चीनकडून पराभव झाला. चीनने या लढतीत भारतीय संघावर ५-० असा विजय साकारला.

सकाळ वृत्तसेवा

चेंगडू (चीन) : भारतीय युवा महिला बॅडमिंटन संघाचा उबेर करंडकातील अ गटातील अखेरच्या साखळी फेरीच्या लढतीत चीनकडून पराभव झाला. चीनने या लढतीत भारतीय संघावर ५-० असा विजय साकारला. या विजयामुळे चीनच्या संघाने तीन गुणांसह पहिले स्थान पटकावले. भारताला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीन व भारत या दोन्ही संघांनी या गटातून बाद फेरीत प्रवेश केला आहे. याच गटातील अन्य लढतीत कॅनडाने सिंगापूरचा ५-० असा धुव्वा उडवला व तिसरा क्रमांक पटकावला.

चेन यू फेई हिने एकेरीच्या पहिल्या लढतीत इशरानी बरुआ हिला २१-१२, २१-१० असे पराभूत करीत चीनला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर चेन किंग - जिया फॅन या जोडीने प्रिया के. - श्रुती मिश्रा या भारतीय जोडीला २१-१३, २१-१२ असे सहज नमवले. हॅन युई - अनमोल खरब यांच्यामध्ये एकेरीची दुसरी लढत रंगली; पण ९-२१, १-४ अशा पिछाडीवर असताना अनमोल हिने दुखापतीमुळे माघार घेतली. त्यामुळे चीनला ३-० अशी विजयी आघाडी घेता आली.

परतीच्या दुहेरीच्या लढतीत सिमरन सिंघी रितिका ठाकेर या भारतीय जोडीला पराभवाचा सामना करावा लागला. लिऊ शू - टॅन निंग या जोडीने भारतीय जोडीला २१-९, २१-१० असे सरळ दोन गेममध्ये पराभूत केले. अखेरच्या लढतीत तन्वी शर्मा हिलाही विजय मिळवता आला नाही. वँग यी हिने तन्वी हिच्यावर २१-७, २१-१६ अशी मात केली.

माझ्या खेळावर मी नाराज आहे. माझ्याकडून खूप चुका झाल्या. चेन फेई हिने छान खेळ केला. माझ्यासाठी ही लढत आव्हानात्मक होती; पण चांगला अनुभव घेता आला.

-इशरानी बरुआ, बॅडमिंटनपटू, भारत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lindsey Graham Death : डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासू खासदाराचे निधन, भारताला दिली होती ५०० टक्के टॅरिफची धमकी

Sangli Weather Forecast Next 5 Days : कोयना, चांदोली धरण क्षेत्रात पावसाची विश्रांती! 24 ते 25 जुलैनंतर मॉन्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता, पाहा हवामान अंदाज

Latest Marathi News Update : अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरीने जगभरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या- केजरीवाल

Thane DCC Bank : ठाणे जिल्हा बँकेवर भाजप-शिवसेना महायुतीचा झेंडा! रवींद्र चव्हाण-एकनाथ शिंदेंच्या 'चाणक्यनीती'मुळे बविआचा गेम ओव्हर, नवे अध्यक्ष कोण?

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

SCROLL FOR NEXT