Cristiano Ronaldo  twitter
क्रीडा

अखेरच्या क्षणी रोनाल्डोचा डबल बार; पोर्तुगालचा 3-० असा विजय

सलामीच्या सामन्यात पोर्तुगालने हंगेरीचा 3-0 असा धुव्वा उडवला.

सुशांत जाधव

UEFA Euro 2020 Portugal vs Hungary : कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डोने अखेरच्या टप्प्यात केलेले दोन गोल आणि राफेल गुरेरो याच्या गोलच्या जोरावर पोर्तुगालने युरो कपमध्ये विजयी सलामी दिली. सलामीच्या सामन्यात पोर्तुगालने हंगेरीचा 3-0 असा धुव्वा उडवला. ग्रुप -F मध्ये पोर्तुगाल आणि हंगेरी यांच्यातील सामना रंगला होता. रोनाल्डोच्या पोर्तुगालने सामन्यात सुरुवातीपासून दबदबा ठेवला. रोनाल्डो 19 व्या आणि 43 मिनिटाला गोलची संधी हुकली. त्याच्याशिवाय फॉरवर्डला खेळणाऱ्या डिओगा जोटाने दोन संधी दवडल्या. परिणामी पहिला हाफनंतर स्कोअर बोर्डवर 0-0 असे चित्रच पाहायला मिळाले.

दुसऱ्या हाफमध्ये पोर्तुगालने आक्रमण कायम ठेवले. 83 व्या मिनिटाला राफेल गुरेरो याने पोर्तुगालला खाते उघडून दिले. त्यानंतर 86 व्या मिनिटाला गोल करत रोनाल्डोने संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. इंज्युरी टाईममध्ये रोनाल्डोने 91 व्या मिनिटाला आणखी एक गोल मिळवून दिला. अखेरच्या क्षणात पोर्तुगालने दमदार खेळाचे प्रदर्शन करत सलामीच्या लढतीत दमदार विजय मिळवला.

पहिल्या हाफमध्ये पोर्तुगालने एकूण 5 गोलच्या संधी निर्माण केल्या. यात त्यांनी 2 ऑन शॉट्स टार्गेट मारले. हंगेरीने केवळ एक संधी निर्माण केली त्यातही त्यांना ऑन टार्गेट शॉट्स खेळण्यात अपयश आले. पहिल्या हाफमध्ये पोर्तुगालने एकूण 5 गोलच्या संधी निर्माण केल्या. यात त्यांनी 2 ऑन शॉट्स टार्गेट मारले. हंगेरीने केवळ एक संधी निर्माण केली त्यातही त्यांना ऑन टार्गेट शॉट्स खेळण्यात अपयश आले. पहिला हाफ गोलशून्य बरोबरीनंतर दुसऱ्या हाफमध्ये अखेरच्या 8 मिनिटाला पोर्तुगालने 3 गोल केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT