Cristiano Ronaldo  E Sakal
क्रीडा

VIDEO : रोनाल्डोचा 'सुसाट' गोल; 15 सेकंदात मैदान मारलं

तो वेगवान आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याचा हा वेग थक्क करणारा असा होता.

सुशांत जाधव

UEFA Euro 2020 Portugal vs Germany : क्रीडा जगतातील सर्वात फिट खेळाडू म्हणून ख्रिस्तियानो रोनाल्डोकडे पाहिले जाते. जर्मनी विरुद्धच्या सामन्यात रोनाल्डोच्या फिटनेसची खतरनाक झलक दाखवून दिली. 36 वर्षांच्या रोनाल्डोने पहिल्या हाफमध्ये 15 व्या मिनिटात संघाला आघाडी मिळवून दिली. हा गोल करताना रोनाल्डोने आपल्या बॉक्समधून थेट जर्मनीच्या गोलपोस्ट पर्यंतचे अंतर 15 सेकंदाहूनही कमी वेळात पार केले. तो वेगवान आहे हे सर्वांनाच माहित आहे. पण त्याचा हा वेग थक्क करणारा असा होता.

संघाला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी रोनाल्डोने दाखवलेली वेगाची गती हा देखील चर्चेचा विषय ठरत आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात अनेक प्रतिक्रिया उमटत असून रोनाल्डोच्या कमालीच्या फिटनेसला चांगलीच दाद मिळताना दिसते. सोशल मीडियावर रोनाल्डोच्या चपळाईचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. वय हा फक्त आकडा असतो, असे अनेक खेळाडूंनी दाखवून दिलंय. रोनाल्डोनेही जर्मनीविरुद्धच्या सामन्यात तिच झलक दाखवू दिली.

जर्मनी विरुद्धच्या सामन्यातील पहिल्या गोलसह रोनाल्डोच्या खात्यात यंदाच्या हंगामात 3 गोलची नोंद झाली. पण त्याच्या संघाला या गोलचा फायदा झाला नाही. जर्मनीने कमालीचे आक्रमण करत पोर्तुगालचा 4-2 असा धुव्वा उडवला. अघ्या 25 मिनिटात त्यांनी रोनाल्डोने मिळवून दिलेल्या आघाडीला सुरुंग लावत मजबूत आघाडी घेतली. जर्मनीने सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतल्यानंतर रोनाल्डोच्याच पासवर डिओगाने एक गोल डागला. पण याने फक्त पराभवाचे अंतर कमी झाले. पोर्तुगालला 4-2 अशा फरकाने पराभवाचा सामना करावा लागला.

रोनाल्डोच्या नेतृत्वाखालील पोर्तुगालने पहिल्या सामन्यात हंगेरीला 3-0 असे पराभूत करत स्पर्धेची सुरुवात दिमाखदार केली. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर आता त्यांच्या समोर फ्रान्सचे तगडे आव्हान असणार आहे. पहिल्या 16 मध्ये स्थान मिळवण्यासाठी फ्रान्सविरुद्धचा सामना पोर्तुगालसाठी महत्त्वाचा असेल. फ्रान्सने जर्मनीला नमवले होते. तर हंगेरीसोबतचा सामना ड्रॉ झाला होता. त्यामुळे ते देखील 24 तारखेला पोर्तुगाल विरुद्धचा सामन्यात विजयाच्या इराद्याने मैदानात उतरतील. हा सामना फुटबॉल चाहत्यांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT