Switzerland vs Spain
Switzerland vs Spain Twitter
क्रीडा

Euro 2021 : स्वित्झर्लंडला नमवत स्पेननं गाठली सेमी फायनल

सुशांत जाधव

Euro 2021 : गोलकिपर सोमरच्या चपळ खेळीच्या जोरावर 10 मॅन स्वित्झर्लंडने तीन वेळा युरो चॅम्पियन असलेल्या स्पेनलाही पेनल्टी शूट आउटपर्यंत नेले. पण पेनल्टी शूट आउटमधील चुकांनी सोमरच्या कामगिरीवर पाणी फेरले. स्पेनने पहिल्यांदा केलेली चूक टाळून तीन शूटवर गोल नोंदवत सेमीफायनलचे तिकीट पक्के केले. बेल्जियम आणि इटली यांच्यातील विजेत्याशी ते सेमीफायनलमध्ये भिडतील. मिनी वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या युरो कप स्पर्धेतील क्वार्टर फायनलमधील पहिली लढत रंगतदार झाली. (UEFA Euro 2021 Switzerland vs Spain Match Score Final Result)


स्वित्झर्लंड आणि स्पेन यांच्यात (Switzerland vs Spain) क्वार्टर फायनलमधील पहिला सामना रंगला होता. आठव्या मिनिटाला स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळाली. पहिल्या हाफपर्यंत ही आघाडी कामय राखण्यात स्पेनला यश आले. दुसऱ्या हाफमध्ये स्वित्झर्लंड कर्णधार शाकीरीने कमालीचा गोल डागत संघाला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली.

स्विस मिडफिल्डर रेमो फ्रीयुलर (Remo Freuler) याने गेरार्ड मोरेनो (Gerard Moreno) याला दिलेले चॅलेंज स्वित्झर्लंडच्या संघाला चांगलेच महागात पडले. रेफ्रींनी 77 व्या मिनिटाला त्याला रेड कार्ड दाखवले. त्यामुळे स्वित्झर्लंडवर 10 मॅनसह खेळण्याची वेळ आली. तरीही स्वित्झर्लंडचा संघ एक्स्ट्रा टाईममध्येही सामना 1-1 असा बरोबरीत ठेवण्यात यशस्वी ठरला. पण अखेर पेनल्टीमध्ये स्पेनच भारी ठरले. स्वित्झर्लंडने पहिला सेमी फायनलिस्ट पेनल्टी शूट आउटमध्ये ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. राज्यात नऊ वाजेपर्यंत 6.64% मतदान

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT